पुणे – नवी दिल्ली येथे स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रित आंतरराष्ट्रीय प्रो टूर टेबल सॉसर चॅम्पियनशीप या स्पर्धेमध्ये लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ ब्रॉडकास्ट अॅण्ड जर्नालिझमच्या (आयएसबीज)े प्रथम वर्षात शिकत असलेला सौरभ महेन्द्र बहादूरकर याने रौप्य पदक मिळविले.
या स्पर्धेत भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, रशिया, कुवेत आणि जर्मनी या देशातील एकूण 850 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारताचे प्रतिनिधित्व करतांना महाराष्ट्राचा एकमेव असा खेळाडू सौरभ बहादूरकरने स्पर्धेत विशेष चमक दाखवित रौप्य पदकावर शिक्कामोर्तब केला.
दिल्ली येथे दि. 24 व 25 ऑगस्ट 2017 रोजी झालेल्या 21व्या राष्ट्रीय टेबल सॉसर चॅम्पियनशीपमध्ये सौरभ बहादूरकर यांनी सिंगल व डबल टेबल सॉसर स्पर्धेत दोन रौप्य पदक मिळवून त्यांने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला होता.
त्यानी मिळविलेल्या यशाबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश तु.कराड व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड यांनी सौरभ बहादूरकर याला शुभेच्छा दिल्या.