पुणे- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘आपला जिल्हा पुणे ‘ यापुस्तिकेचे प्रकाशन जिल्हयाचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते विधान भवन येथे करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे विभागाचे माहिती उपसंचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.
“आपला जिल्हा पुणे” या पुस्तिकेमध्ये पुणे जिल्हयाची ऐतिहासिक, भौगोलिक तसेच वन विभाग, शिक्षण, सिंचन, कृषी, उद्योग विभागाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याबरोबरच जिल्हयातील दळण-वळण, तीर्थस्थळे/प्रार्थनास्थळे तसेच पर्यटन स्थळांचीही सर्वसमावेशक माहिती देण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर या जिल्हा पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. उपसंचालक मोहन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, माहिती सहायक संग्राम इंगळे, जयंत कर्पे तसेच महसूल विभाग, विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे तसेच अन्य विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या पुस्तिकेसाठी पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच या कार्यालयाच्या माहिती अधिकारी श्रीमती वृषाली पाटील, माहिती सहायक सर्वश्री संग्राम इंगळे, जयंत कर्पे, विलास कसबे, रोहित साबळे, सुगत जोगदंड यांचे सहकार्य लाभले. नरेंद्र वासनिक, सूर्यकांत कासार, संजय गायकवाड, नितीन सोनवणे, चंद्रकांत खंडागळे, संतोष मोरे, अक्षय माटे यांनी छायाचित्रे उपलब्ध करुन दिली. याशिवाय ज्ञानेश्वर कोकणे, वैशाली रांगणेकर, मिलिंद भिंगारे, विशाल कार्लेकर, पंढरीनाथ शेलार, विलास कुंजीर, मोहन मोटे, ए.एम. खान, शोभा मोहिते, विशाल तामचीकर यांनी सहकार्य केले.
‘आपला जिल्हा पुणे’ पुस्तिकेचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रकाशन
Team TNV August 17th, 2017 Posted In: Pune Express
Team TNV