पुणे – विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांची संघर्षागाथा सांगणाºया आय अॅम अॅन आंत्रप्रिन्युअर या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यावसायिकाचा विविध पुरस्कारांनी सन्मान केला जाणार आहे. हा कार्यक्रम शनिवार दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घोले रस्ता येथील पं. जवाहरलाल नेहरु सभागृह येथे होणार आहे, अशी माहिती आय अॅम अॅन आंत्रप्रिन्युअर पुस्तकाचे संपादक आणि लेखक पराग गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सुहास फडणीस, अभिजीत केळकर, स्वानंद समुद्र, महावीर बांठिया, प्रदीप बेरी उपस्थित होते. पराग गोरे म्हणाले, उद्योजकांना व्यवसायासाठी उपयुक्त अशी माहिती या पुस्तकामध्ये आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील उद्योजकांच्या व्यवसायाविषयी, त्यांच्या विचार प्रक्रियेविषयी, त्यांनी त्यांचा व्यवसाय कशाप्रकारे वाढविला याविषयी माहिती पुस्तकामध्ये मांडण्यात आली आहे. अभिनेता/निर्माता संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, निर्माते/दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, मिलींद मराठे, मंदार जोगळेकर उपस्थित राहणार आहेत. तसेच संदीप कुलकर्णी आणि श्रीरंग गोडबोले यावेळी उपस्थितांना व्यवसाय कसा वाढवावा याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
सुहास फडणीस म्हणाले, पुस्तक प्रकाशनानंतर व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या विविध व्यक्तींना बिझनेस मंत्रा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. जितेंद्र जोशी यांना सेल्फ मेड मॅन पुरस्कार, अंकुर चक्रवर्ती यांना स्टार्टअप यंग आंत्रप्रुनिअर पुरस्कार, महेंद्र कोलते यांना इनोव्हेशन पुरस्कार, युवा बिझीनेसचे विजय कोटगोंड यांना बेस्ट बिझीनेस कोच आॅफ द इअर पुरस्कार,नितीन मोरे व स्टिव्हन क्रिस्ती यांना आंत्रप्रुनिअरशिप पुरस्कार, नितीन कदम यांना आंत्रप्रुनिरिअल इन्स्पिरेशन पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.