पुणे – ‘भारत माता की जय’, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अशा घोषणा देत देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त ‘नवभारत निर्मिती संकल्प ते सिध्दी’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘एकता दौड‘ला आज पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. खंडजीबाबा चौकातून सुरू झालेल्या ‘एकता दौड’ला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी हिरवा झेंडा दाखविला. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, समन्वयक योगेश गोगावले, सभागृह नेता श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून आपल्याला ‘एक भारत’ मिळाला आहे. या देशाच्या एकात्मतेचे संवर्धन करताना जगात सर्वात पुढे असणारा श्रेष्ठ भारत निर्माण करायचा आहे. त्यासाठी गरीबी, भ‘ष्टाचार, अस्वच्छता, जातीयवाद, दहशतवाद यांच्यापासून मुक्त नवभारत निर्मितीसाठी कटिबध्द होण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केले.
उपक‘माचे समन्वयक योगेश गोगावले यांनी प्रास्ताविक भाषण केले व नवभारत निर्मितीची शपथ दिली. स. प. महाविद्यालयाजवळ एकता दौडचा समारोप झाला. ३० शाळांमधील पाच हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. पुणे जिल्हा क्रीडा समिती, क्रीडा परिषद या संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
डॉ. के. एच. संचेती, सिंबायोसिसचे डॉ. शां. ब. मुजुमदार, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे राजन गोरे, सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी दीपक माने, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दीलीप सेठ, लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर, लेफ्टनंट जनरल व्ही. एम. पाटील, पुणे मॅरेथॉनचे प्रल्हाद सावंत, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे संस्थापक सचिव बाळासाहेब लांडगे, बुध्दीबळपटू आकांक्षा हगवणे, जलतरणपटू राहुल मोरे, नीलीमा पोंक्षे, मारुती आडकर, मंजू जुगधर, शकुंतला खटावकर, गुरुबंस कौर, रेखा भिडे, हेमंत जोगदेव आदी मान्यवर सहभागी झाले होते.