पुणे – महावितरणच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी वीजग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुणे परिमंडलात गेल्या तीन महिन्यांत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणारे 60 हजार 607 वीजग्राहक वाढले असून नोव्हेंबरमध्ये एकूण 7 लाख 23 हजार 409 वीजग्राहकांनी मोबाईल अॅप व वेबसाईटच्या माध्यमातून 129 कोटी 44 लाख रुपयांचा घरबसल्या वीजबिल भरणा केला आहे.
वीजबील भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध झाली आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in
पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यात गेल्या नोव्हेंबर महिन्यात तब्बल 7 लाख 23 हजार वीजग्राहकांनी 129 कोटी 44 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे. यात पुणे शहरातील 4 लाख 43 हजार वीजग्राहकांनी 76 कोटी 69 लाख तर पिंपरी चिंचवड शहरातील 2 लाख 2 हजार ग्राहकांनी 35 कोटी 97 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे. तसेच खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव व मुळशी तालुक्यातील 78 हजार ग्राहकांनी 16 कोटी 76 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ भरणा केलेला आहे.
महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in या