कसबा गणपती मंडळात पहिल्या मिनरल वॉटर प्लांट चे उदघाटन

August 31st, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे : गणपती पाहतांना मिनरल वॉटर प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन टाकून देण्याचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने ‘रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड ‘ च्या वतीने पुण्याच्या गणेश मंडळात मिनरल वॉटर प्लांट बसविले जात आहेत . या योजनेतील पहिल्या पथदर्शी प्रकल्पाचे उदघाटन गुरुवारी सकाळी झाले .

पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती असलेल्या कसबा गणपती मंडळात पहिल्या मिनरल वॉटर प्लांट चे उदघाटन रोटरी क्लब चे प्रांतपाल अभय गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले . ३०० लिटर प्रति तास क्षमतेच्या या मिनरल वॉटर प्लांट (आर . ओ . प्लांट ) साठी दोन लाख खर्च आला आहे . ​या प्लांट मधील मिनरल वॉटर मोफत भाविकांना दिले जाणार आहे . ​

मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे ,रोटरी क्लब ऑफ सिंहगड चे अध्यक्ष अशोक भंडारी ,श्रीकांत पाटणकर ,रोटरी वॉटर कमिटीचे अध्यक्ष सतीश खाडे ,निलेश वकील ,अभिजित पवार ,भाऊसाहेब पवार उपस्थित होते

​’रिसायकल न होऊ शकणाऱ्या ​प्लास्टिक बाटल्यांमुळे पर्यावरणाची हानी होत आहे . नद्यांमध्ये वाहत जाणाऱ्या प्लस्टिक बाटल्या नष्ट न होता हजारो वर्षे जलचर आणि पर्यावरणाची हानी करीत राहतात . त्यामुळे प्लास्टिक बाटल्यांचा वापर कमी करण्याचे उपाय शोधण्याची गरज आहे . गणेश मंडळात मिनरल वॉटर प्लांट हा त्यातील एक उपाय होऊ शकतो . गणेश मंडळातच मिनरल वॉटर मोफत मिळाले तर प्लास्टिक बाटल्या कमी होण्यास मदत होईल . तेवढ्या बाटल्या प्लास्टिक कचऱ्यात जाणार नाहीत ,आणि गटारे – नदी-नाल्यात जाणार नाहीत ‘ असे यावेळी सांगण्यात आले

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions