कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

September 26th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे

पुणे शहराचे पोलीस सह-आयुक्त रविंद्र कदम यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 6 ऑक्टोबर 2017 रात्री  12 वाजेपर्यंत  मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी  केला आहे.

यानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे अथवा बाळगणे, कोणत्याही इसमाचे, चित्राचे, प्रतीकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांचे चित्रांचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सभ्यता अगर नितिमत्ता राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे वर्तन करणे यास मनाई करण्यात येत आहे. तसेच मोठ्याने घोषणा देणे, मिरवणूक काढणे,  भाषण करणे, अविर्भाव करणे, सभा घेणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक इसमांचा जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती कायद्यानुसार शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions