कॉंग्रेसचा राणेंवर भरोसा नाय काय??

September 17th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

कोकणातील जेष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पक्षांतर करणार या चर्चेला लवकरच पूर्णविराम मिळेल. पितृपक्ष संपताच कोकणात मोठा राजकीय भूकंप घडणार याचे स्पष्ट संकेत नारायण राणे यांनी नुकत्याच घेतलेल्या सिंधुदुर्ग काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या सभेत मिळाले आहेत. या सभेत पहिल्यांदा राणे यांनी आपल्या कोकणी आवाजाला वाट मोकळी करून दिली आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांबाबत वेगवेगळे गौप्यस्फोट केलेत. विशेष म्हणजे एकाच दिवशी काँग्रेसच्या दोन बैठकांचे जिल्ह्यात आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी येथे दुसरी बैठक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष खासदार हुसेन दलवाई यांनी बोलावली होती. या बैठकीबाबत राणे गटाला कोणतीच माहिती देण्यात अली नव्हती असा दावा राणे गटाकडून केला जात आहे तर आम्ही कळवण्याचा प्रयत्न केला मात्र जिल्हाध्यक्षांशी संपर्क होऊ शकला नाही असा जुन्या काँग्रेसींचे नेते विकास सावंत सांगतात. परंतु हि दुसरी बैठक कळताच नारायण राणे यांची जी स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली त्यामुळे राज्यस्तरावरील नेत्यांसह जिल्ह्यातील काही नेत्यांची मात्र जी काही टिंब टिंब झाली ती त्यांच्या सावरासावरीतून  सर्वानी अनुभवली.  कोकणातील जेष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पक्षांतर करणार या चर्चेला लवकरच पूर्णविराम मिळेल. पितृपक्ष संपताच कोकणात मोठा राजकीय भूकंप घडणार याचे स्पष्ट संकेत नारायण राणे यांनी नुकत्याच घेतलेल्या सिंधुदुर्ग काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या सभेत मिळाले आहेत. या सभेत पहिल्यांदा राणे यांनी आपल्या कोकणी आवाजाला वाट मोकळी करून दिली आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांबाबत वेगवेगळे गौप्यस्फोट केलेत. विशेष म्हणजे एकाच दिवशी काँग्रेसच्या दोन बैठकांचे जिल्ह्यात आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी येथे दुसरी बैठक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष खासदार हुसेन दलवाई यांनी बोलावली होती. या बैठकीबाबत राणे गटाला कोणतीच माहिती देण्यात अली नव्हती असा दावा राणे गटाकडून केला जात आहे तर आम्ही कळवण्याचा प्रयत्न केला मात्र जिल्हाध्यक्षांशी संपर्क होऊ शकला नाही असा जुन्या काँग्रेसींचे नेते विकास सावंत सांगतात. परंतु हि दुसरी बैठक कळताच नारायण राणे यांची जी स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली त्यामुळे राज्यस्तरावरील नेत्यांसह जिल्ह्यातील काही नेत्यांची मात्र जी काही टिंब टिंब झाली ती त्यांच्या सावरासावरीतून  सर्वानी अनुभवली.  कोकण हा तसा एकेकाळचा समाजवादाचा बालेकिल्ला. येथे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस पक्ष सहानुभूतीच्या लाटेवर बहरला. मात्र हि स्थिती फारकाळ टिकली नाही. मुबईस्थित नगरसेवक आणि बीएसटीचे चेअरमन म्हणून नावलौकिक मिळविलेल्या कोकणातीलच नारायण राणे यांना शिवसेनेने ९० च्या दशकात निवडणूक रिंगणात उतरविले, येथेच काँग्रेसचे पानिपत झाले. शिवसेनेने राणेंच्या नेतृत्वाखाली अवघे कोकण व्यापले. राणेंनी नव्या दमाच्या उमद्या कार्यकर्त्यांची फौज उभी केली. जाती धर्माच्या पलीकडे जात आपला कार्यकर्ता हीच भावना राणेंनी जपली. सेना गावागावात अगदी लागण लागावी तशी वाढत गेली . म्हणता म्हणता सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राणेंच्या नेतृत्वाखालील सेनेच्या भगव्याखाली आल्या. कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री म्हणून कोकणच्या विकासाला नवा आयाम देण्याचे काम नारायण राणे यांनी केले. पुढे विरोधी पक्ष नेता म्हणूनही राणेंचा दबदबा कोकणसह संपूर्ण राज्यात राहिला. “कोकणचा विकास म्हणजे राणे आणि राणे म्हणजेच विकास” हे एकच समीकरण कोकणच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. काही वर्षांपूर्वी राणेंनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि इथली सत्ताकेंद्र काँग्रेसकडे गेलीत. मागच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात राणेसह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले, लोकसभेला नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र माजी खासदार निलेश राणे यांचा पराभव झाला.  तरीही जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र राणेंनी कम बॅक केले. राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला होता तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राणेंनी एक हाती जिंकली होती. कणकवली या राणेंच्या बालेकिल्ल्यात विरोधकांना एकही जागा मिळवता आली नाही. विधानसभेला कुडाळ मतदार संघात नारायण राणेंचा पराभव झाला तरी त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी देवगड विधानसभा मतदार संघात साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होऊनही मोठ्या फरकाने विजय संपादन केला होता.  राणेंच्या काँग्रेसमधल्या वाटचालीत त्यांच्या मेहनतीचे फारसे चीज झलेले दिसत नाही. कारण मुख्यमंत्री पद देण्याचे आस्वासन देऊन त्यांना काँग्रेस प्रवेश देण्यात आला होता. परंतु आपल्या परंपरेला साजेसे काँग्रेस वागली आणि तब्बल तीन वेळा राणेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडते असे वाटत असताना त्यांना दूर सारण्यात आले. राणेंसारखे प्रचंड ताकदीचे राज्यव्यापी नेतृत्व असतना काँग्रेसने अगदीच दुबळे लोक महाराष्ट्राच्या गादीवर बसविले. येथेच काँग्रेसचाही  कपाळमोक्ष झाला.  सिंधुदुर्गच्या बाबतीत विचार केला तर येथे काँग्रेस मध्ये राणे येण्यापूर्वी काँग्रेस नव्हती का? तर ती होती मात्र सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक संस्थानिकांच्यात विखरून गलितगात्र होऊन राहिली होती. लोकांमधले चेहरे कॉंग्रेसने कधीच गमावले होते. रमाकांत सावंत मात्र त्याला अपवाद म्हणता येतील. हुसेन दलवाई, अजित घोरपडे यांच्यासारखे पाहुणे कलाकार कधीतरी येऊन तिला जागे करत होते. राणे यांच्या विरोधात पोंपटपंची करून झाली कि मालवणी पाहुणचाराचा आस्वाद घेऊन परतल्यावर नेतृत्वाला मात्र सार काही आलबेल असल्याचा अहवाल दिला कि याचे काम संपले. सुधीर सावंत यांनी आपली सारी हयात राणेंना राजकीय दहशतवादी म्हणण्यात घालवली. राणेंना सिंधुदुर्गाच्या राजकारणातून संपविण्याची भाषा करणारे सावंत राणे काँग्रेस मध्ये येताच त्यांच्या बंगल्यावर जेवणावळीत दिसले. सावंतांच्या बोंबलण्याने राणेंचं फारसं काही बिघडलं नाही मात्र सुधीर सावंत यांचं अस्थित्व सिंधुदुर्गच्या राजकारणातून संपुष्टात आले. विजय सावंत हे राजकारण्यापेक्षा चाकरमानी जास्त असल्याने ते असून नसल्यासारखेच आहेत. त्यामुळे राणेंनी कॉंग्रेस सोडली तर तिला नेतृत्व द्यायला कोणी उरेल याची शक्यता फारच कमी. सावंतवाडीचे विकासभाई सावंत हे मात्र कॉंग्रेस सोडणार नाहीत. मात्र हे भाई जेथे आपल्या मुलाला सेनेत जाण्यापासून रोखू शकले नाहीत ते कॉंग्रेसला नेतृत्व देऊ शकतील हे दुरापास्थच. त्यामुळे राणेंना गमविण्याची कॉंग्रेसला मोठी किंमत मोजावी लागणार हे नक्कीच. नारायण राणेंच्या बाबतीत एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे राणे आमदार झाले आणि सर्वप्रथम श्रीधर नाईक हत्येचा त्यांच्यावर आरोप झाला. त्यांना या प्रकरणी आरोपीहि बनविण्यात आले. यानंतर अनेक आरोप या नेत्याने झेलले परंतु लोकांच्या चर्चेत राहिले ते कोकणचे भाग्यविधाते राणेच म्हणून. कोकणच्या आणि पर्यायाने राणेंचा राज्यातल्या राजकारणातला दबदबा वाढत गेला आणि राणेच्या भोवती काही कार्यकर्त्यांचे कडे उभे राहिले. त्यांची लोकांशी असलेला संपर्क कमी झाला. त्याचा काही प्रमाणात त्रास अनेकांप्रमाणे या नेत्याला सहन करावा लागला. परंतु काही नेते राणेंपासून दूर गेले आणि हे कडे तुटले पुन्हा एकदा राणेंचा लोकांशी थेट संपर्क होऊ लागला. यात प्रमुख भूमिका बजावली आहे ती त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांनी. नितेशजींचा लोक संग्रह मोठा आहे. त्यांनीही स्वताची कार्यकर्त्यांची एक मोठी फळी कोकणात उभी केली आहे. कोणताही उत्सव असो किवा कार्य प्रसंग आमदार आवर्जून पोचतात. नारायण राणेंसारखाच त्यांचाही पक्षात आणि जिल्ह्यात दबदबा आहे. लोकसभा आणि विधानसभेत राणे कुटुंबियांना सहन कराव्या लागलेल्या परभवाचा नितेश राणे यांनी खूप चांगला अभ्यास केलेला आहे. अलीकडे तर त्यांनी आपल्या मतदारसंघासह जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावण्याचा धडाकाच लावला आहे. चतुर्थीच्या काळात तर हा तरुण नेता आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी दर्शनासाठी फिरत असताना चालून त्यांच्या पायाला आलेले फोड आम्ही स्वतः पहिले आहेत. एकंदरीत राणे कुटुंबियांची हि मेहनत कार्यकर्त्याला आपलेसे करताना जनमत आपल्याबाजूने राखण्यात महत्वाची ठरताना दिसते. त्यामुळे राणेंनी पक्षांतराचा निर्णय जाहीर केला तर कोकण पुन्हा एकदा राजकीय भूकंपाने हादरणार आहे. हा भूकंप होत असताना राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा राजकारणातील धगधगत्या पटाचा जो देखावा कोकणवासीयांनी पाहिला तो यावेळी पहायला मिळणार नाही किंबहुना तो पहायला मिळू नये हि समस्त कोकणवाशियांचीच इच्छा आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions