पुणे – मुंबईहून पुण्याकडे येणार्या रेल्वे ट्रॅकवर मंकी हिल व खंडाळा दरम्यान मालगाडीचे काही डबे गुरुवारी रुळावरून घसरले. दुपारी 4वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामुळे मुंबई-पुणे, पुणे-मुंबई व मुंबई-कोल्हापूर दरम्यान अनेक रेल्वे गुरुवारी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
11009 मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस कर्जत स्टेशनवरून पुन्हा माघारी सीएसटीकडे रवाना करण्यात आली. 12125 मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस, 12123 मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, 11023 मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, 17411 मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, 17412कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, 22107 मुंबई-लातूर एक्स्प्रेस, 12128 पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, 22106 इंद्रायणी एक्स्प्रेस गुरुवारी रद्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे 12115 सिद्धेश्वर एक्स्प्रेस मुंबई ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आली. 11008 पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेसने पुण्याहून काही अंतर पार केले, मात्र तिला पुणे स्टेशनवर पुन्हा माघारी बोलावण्यात आले. अन्य रेल्वेंच्या वेळेत बदल करण्यात आला असून काही रेल्वे अन्य मार्गे वळविण्यात आल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, मुंबईहून पुण्याला येणार्या रेल्वे गुरुवारी रद्द करण्यात आल्याने शुक्रवारी रेक उपलब्ध नसल्याने 12126 पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, 12124 पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
रद्द झालेल्या ट्रेन्स
सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)
सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन रद्द (7 सप्टेंबर)
सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस कर्जतपर्यंतच (7 सप्टेंबर)
पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)
पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)
पुणे-सीएसएमटी डेक्क्न एक्स्प्रेस पुण्याजवळच थांबवली (7 सप्टेंबर)
पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन ( 8 सप्टेंबर)
पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस ( 8 सप्टेंबर)
सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)
सीएसएमटी-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)
कोल्हापूर-सीएसएमटी सह्याद्री एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)
कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच (7 सप्टेंबर)
सीएसएमटी-लातूर एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)
सीएसएमटी-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस मुंबई ते पुण्यादरम्यान रद्द (7 सप्टेंबर)
सीएसएमटी-हैदराबाद हुसैन सागर एक्स्प्रेस (7 सप्टेंबर)
अहमदाबाद -पुुणे अहिंसा एक्स्प्रेस पश्चिम रेल्वेवर थांबवली (7 सप्टेंबर)
इंदूर-पुणे एक्स्प्रेस सुरतमध्ये रद्द (7 सप्टेंबर)
दादर-मैसूर शरावती एक्स्प्रेस रद्द (7 सप्टेंबर)
बिजापूर/साईनगर शिर्डी -सीएसएमटी फास्ट पॅसेंजर पुण्यापर्यंत थांबवली (7 सप्टेंबर)