पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात पर्यावरण रक्षणासाठी फटाकेमुक्त दिवाळीचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक पध्दतीने दिवाळी साजरी करताना fटाके न उडविण्याची शपथ देण्यात आली. मीरा ठकार यांनी दीपज्योती नमोस्तुते या कार्यकमाद्वारे दिव्यांचे महत्व समजावून सांगितले. तसेच दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व समजावून सांगितले. मुख्याध्यापिका कल्पना धालेवाडीकर यांनी मार्गदर्शन केले. सुनील भंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोळवलकर गुरुजी विद्यालयात फटाकेमुक्त दिवाळी
Team TNV October 15th, 2017 Posted In: Pune Express
Team TNV