पुणे – न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटतर्फे दुस-या जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, डॉजबॉल, रिले यांसारख्या सांघिक आणि तिरंदाजी, बुध्दीबळ, धावणे, कराटे, यांसारख्या वैयक्तिक क्रीडाप्रकारांत या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये मराठी, इंग्रजी माध्यमातील ६ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलचे यंदा दुसरे वर्ष होते. स्पर्धेचे उद्घाटन प्रा.डॉ.सुधाकर जाधवर यांच्या हस्ते झाले. यावेळी शार्दुल जाधवर हे उपस्थित होते. स्पर्धेत ज्युनियर केजी ते इयत्ता १० वी या वयोगटातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. विजेत्या खेळाडुंना मेडल, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यंदा संस्थेच्या प्रांगणात विविध खेळांमधील खेळाडूंची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते.
प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर कला व वाणिज्य महाविद्यालय, शार्दुल सुधाकरराव जाधवर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग, पॅराडाईज ज्युनियर कॉलेज, पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूल, जाधवर इंटरनॅशनल स्कूल, प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंद्रप्रस्थ, पॅराडाईज किडस्, जाधवर इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आदित्य इन्स्टिटयूट आॅफ मॅनेजमेंट, प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर विज्ञान महाविद्यालय या संस्थेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रा.डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले, सध्याच्या डिजीटल युगात विद्यार्थी लहान वयातच डिजीटलाईज होतात. यामुळे मैदानी खेळात ते मागे पडत आहेत. विद्यार्थ्यांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहन देण्याकरीता जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.