पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल, नवीन मराठी शाळा, डी ई एस सेकण्डरी स्कूल आणि मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले होते.
अहिल्यादेवीच्या मु‘याध्यापिका सुलभा शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सई आपटे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट भाषणातून उलगडला. सावित्री बाईंच्या आम्ही लेकी हे समूहगीत सादर करून सावित्रीबाईंचा वसा पुढे चालविण्याचा निर्धार केला. शिक्षिका अद्वैता उमराणीकर यांनी त्यांच्या कार्याची माहिती सांगितली, शिक्षिका अनिता जाधवर यांनी कविता सादर केली. पर्यवेक्षिका अनघा डांगे, स्मिता करंदीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवीन मराठी शाळेत शाला समितीचे अध्यक्ष सुनील भंडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. गर्भातील सावित्रीची हत्या चालूच आहे हा स्त्री भ‘ूणहत्येवरील एकपात्री प्रयोग अनुपमा हिंगणे या विद्यार्थिनीने सादर केला. सानिया भंडारे हिने सावित्रीबाईंचे मनोगत व्यक्त केले. मु‘याध्यापिका कल्पना वाघ, तनुजा तिकोने, स्वप्नील सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात मु‘याध्यापिका कल्पना धालेवाडीकर यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मनोरमा करंबेळकर या विद्यार्थिनीने सावित्रीबाईंच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांसमोर आत्मकथन केले. डी ई एस सेकण्डरी स्कूलमध्ये मुख्याध्यापिका सुजाता नायडू व प्रायमरीच्या मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी यांनी पूजन केले.