पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्री-प्रायमरी स्कूलच्या मातृमंदिरमध्ये ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आजी-आजोबांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी विशेष उत्साहात आजी-आजोबांना शाळेत घेऊन आले. शाळा, शाळेचा परिसर, मैदान, ग‘ंथालय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची ओळख करून देत होते.
अमृता भोईर, कल्याणी कदम यांनी देवीस्तुती व रामायणातील सिताहरण या प्रसंगांवर नृत्यकथा सादर केल्या. अनिता गोडबोले, कल्पना बालाजी यांनी रामायणातील काही प्रसंग गीतरामायणातील गीतांच्या तालावर नृत्याद्वारे सादर केली. नवरात्रीनिमित्त झाशीची राणी लक्ष्मीबाईचा प्रेरणादायी जीवनपट नृत्याद्वारे उलगडून दाखविला.
एकत्र कुटुंब पध्दती, लहान मुलांवर आजी-आजोबांकडून होणारे संस्कार, नात्यातील जिव्हाळा याची माहिती शिक्षिका प्रियांका बालगुडे यांनी सांगितली. आजी-आजोबांनीही नातवंडांसाठी काही कार्यक‘म सादर केले. संचालिका माधुरी बर्वे यांनी स्वागत केले. मनाली कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.