समिल जळवी
कुडाळ शहरातील कविलकाटे येथील थोरला गणपती प्रसिंध्द आहे तो त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तिकामामुळे. जळवी घराण्यातील बारा कुटुंबियांचा सर्वात मोठा गणपती म्हणून त्याची ओळख आहे. हा गणपती चिकणमातिच्या २१ गोळ्यापासुन बनविला जातो, सुबक मूर्ती आणि मनमोहक रंगकाम यामुळे थोरल्या घरातला हा गणपती सर्वांचाच आवडता आहे. या गणपतीची मूर्ती ही कित्तेक वषाँपासुन नेरुर गावातील सुप्रसिद्ध मूर्तिकार अण्णा मेस्त्री हे थोरल्या घरी येऊनच बनवित असत परंतु त्यांचे निधन झाल्याने हि परंपरा आता त्यांचा मुलगा रवी मेस्त्री व त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. अनेक वर्षांपासून जळवी घराणे जुन्या रूढी ,परंपरा जपते आहे तसेच मनोभावे बाप्पाची ५/७/११/१७/२१/ अशा दिवशी विविध उपक्रम करत सेवा करत आहे. आरती,भजने व फुगडया मोठया भकती भावाने सादर केल्या जातात. ढोल, ताश्या आणि ताळ मृदंगाच्या जयघोषात मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या थोरल्या गणपतीला नवैँद्य बनवताना एक परंपरा आजही जपली जात आहे. काही कुटुँबे वेगवेगळी राहत असली तरी मात्र गणेश चतुथीँ दिवशी सर्व बारा कुटुंबे एकत्र येतात आणि गणपतिचा नवैंद्य बनवितात. या सर्व बारा कुटुंबियांचा नवैंद्य थोरल्यागणपतीला दाखवला जातो.तसेच हा गणपती असेपर्यंत या बांपाच्या दर्शनासाठी कुडाळ तालुक्याती व तालुक्याबाहेरील बरेचसे गणेश भक्त येत जात असतात. विसर्जनादिवशी दुपारी महापसाद झाल्यावर दुपारनंतर किमान ३ ते ४ तासआरत्या,भजने,फूगडयांचे सादरीकरण केले जाते.जळवी घराण्यातील सर्व थोरले कुटुंब भक्तीमय वातावरणात तल्लीन होतात. त्यानंतर संध्याकाळी ढोल,ताशयाच्या गजरात लेझिम वर ताल धरत वाजत ,गाजत विसर्जनासाठी बाप्पाची मूर्ती बाहेर काढली जाते.बाप्पा हा चौदा विद्या आणी चौसषठ कलांचा आधिपती असल्याने त्याची झिंगाट गाण्यांवर मिरवणूक काढणे चुकीचे आहे असे जळवी कुटुंबीय मानतात. म्हणून भक्तिमय गीते आणि ढोल, तासे, टाळ, मृदंग अशा वाद्याच्या संगतीने मिरवणूक पुढे सरकते, मोठ्या भक्ती भावाने निरोप दिला जातो.