दक्षिणकाशीतील अनोखा गणेशोत्सव: येथे बाप्पाला देतात पंढरपुरी भत्ता

September 6th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

कुलकर्णी सर, पंढरपूर

महाराष्ट्राची दक्षिणकाशी असणा-या पंढरीत कायमच ज्ञानोबा- तुकोबांचा गजर  असतो. मात्र याच पंढरीत भाप्रदपदांच्या दहा दिवसामधे अर्थात गणेशोत्सवामधे बाप्पांच्या गजरांची एक आगळीच झालर ही निर्माण झालेली असते. यामधे विठठल मंदिरातील देखिल गणेशोत्सवाची मोठया प्रमाणावर धुम असतेच. याशिवाय शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळे  भागवत धर्माची पताका घेउन गणेशोत्सव साजरा करताना दिसून येतात. अशाच काहीशा आगळया पंढरीच्या गणेशोत्सवांचा एक आढावा विठठल मंदिरातील गणेशोत्सव  पंढरी नगरी म्हटली की , केवळ  आषाढी यात्रा आणि अठठावीस युगापासून विटेवर उभी असणारी विठठलांची मूर्ती आठवत असते. पण याच विठठलांच्या पंढरी नगरीला गणेशोत्सवांची देखिल एक वेगळी  पंरपरा , इतिहास  आहे. गणेशोत्सवांचा केवळ  इतिहासच नव्हे तर यांची मराठी साहीत्यामधे देखिल द. मा. मिराजदार यांच्या रूपाने नोंद आहे.     वास्तविक पाहीले तर स्वातंत्र्यपूर्व काळात जरी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झालेले असले. तरी देखिल विठठल मंदिरातील गणेशोत्सवांच्या निमित्ताने संपूर्ण पंढरपूरांचा एकच गणपती हा सार्वजनिक झालेला होता. आणि यातूनच संपूर्ण पंढरपूरकर हे घरगुती गणेशांच्या मूर्तीचे विसर्जन करून मंदिरातील गणेशांच्या विसर्जन मिरवणुकीमधे तसेच या उत्सवामधे सहभागी होत होते.  येथील मंदिरातील गणपती हा पूर्वी वाजत गाजत मंदिरामधे जाउन स्थानापन्न होत होता. त्यानंतर शेवटच्या दिवशी या मूर्तीची विजर्सन मिरवणुक देखिल थाटात निघत असे. यामधे विठठलाचा शाही लवाजमा  सोबत असायचा. अबदागिरी , बत्त्यांचा उजेड, तसेच सनई यांच्या निनादात ही मिरवणुक निघत असे. यामधे पूर्वी बडवे – उत्पात सेवाधारी मोठया उत्साहाने सामील व्हायचे. यावेळीच चातुर्मासातील भाविक देखिल मोठया संख्येने सामील होत होते. त्यामुळे  पूर्वी ज्यावेळी  सार्वजनिक गणेशोत्सव नसायचे. त्यावेळी  विठठलांचा असणारा गणपती हा मानांचा आणि सर्व भाविकांचाच बनला गेलेला होता. महाजन – बडवेंची मातीची मूर्ती     विठठल मंदिरातील गणेशोत्सवाबाबत सांगायचे झाले. तर येथील गणपती हा येथील बडवे – महाजन कुंटुबियांकडून हाताने संपूर्णपणे मातीने बनविलेला असायचा. विशेष म्हणजे प्रत्येकवर्षी एकच पध्दतीची आणि कायमच हुबेहुब दिसणारी मूर्ती असायची. बडवेकडे जोपर्यत मंदिर होते. तोपर्यत सदरची मुर्ती ही बालाजी महाजन बडवे करीत होते. आताही ते बडवे समाजाच्या गणेशोत्सवासाठी हातानेच मूर्ती बनवितात. त्यामुळे पंढरपूराचा गणेशोत्सव हा मूर्तीमुळे  देखिल आगळाच असताना दिसून आलेला आहे.पंचक्रोशीतील गणेशमंदिरे ….    पंढरपूरात जसे विठठलांच्या मंदिरा समवेतच गणपतीची देखिल विविध मंदिरे आहेत. यामधे पाहीले तर नामदेव पायरी येथेच धुंडीराज गणपती म्हणून एक पुरातन गणेश मंदिर आहे. याचबरोबर विठठल मंदिराच्या महाव्दारामधून प्रवेश केल्यावर आतमधेच विघ्नहर्त्या गणेशाचे मंदिर आहे. याचरबोबरीने विठठल मंदिराच्याच परिवार देवतामधील एक असणा-या रिद्धी  सिध्दी गणेश मंदिर देखिल आहे. या गणेश मंदिराचा मोठा इतिहास आहे. दस-यांचे इतर नागरीकांसमवेतच विठठलांचे देखिल सिमोलघंन रिद्धी सिध्दी गणपतीच्या मंदिरामधे होत असते. त्यामुळे  या गणेशाला विशेष महत्प प्राप्त आहे.   याचबरोबरीने पंढरपूरच्या नजीकच ८ किमी अंतरावर पखालपूर याठिकाणी देखिल गणपतीचे एक पुरातन मंदिर आहे. सदरचा गणपती हा येथील एका भाविकांला प्रसन्न झाला असल्याची आख्यायिका सांगणारा  आहे. विशेष म्हणजे ही गणेशमूर्ती महड येथील गणेशमूर्तीच्या समकक्ष असल्यांचे काही इतिहासतज्ञ सांगतात. त्यामुळे  पंढरपूर शहरासोबतच पखालपूरचा गणपती देखिल आपले वेगळेपण सांगून जाणारा आहे. सार्वजनिक मंडळाचे पंरपरा आणि कलाविष्कार  आजमितीला पाहीले तर पंढरीत शेकडो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे  आहेत. यामधे चौफ़ळा तरूण मंडळ  हे सर्वात जुने गणेश मंडळ  म्हणून ओळखले जाते. या मंडळाच्या माध्यमातून आजही पंढरपूरची पंरपरा जपत. प्रवचने , किर्तनाचे कार्यक्रम होतात. याचबरोबरीने येथील प्रसिद्ध  असणा-या सहकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी कलाधिपती समजल्या जाणा-या गणेशाला वंदन करण्यासाठी चक्क दीडशे बाल तबलावादक याठिकाणी आपली कला सादर करतात. आणि ख-या अर्थाने ६४ कलांच्या अधिपतीसमोर नतमस्तक होतात.          एकीकडे चौफळा येथील आध्यात्मिक पंरपरा तर सहकारचा कलाविष्कार असतातना. दुसरीकडे अगदी पारंपारिक पध्दतीने घोंगडे गल्ली येथील देखिल गणेशांची विजर्सन मिरवणुक ही गेल्या अनेक दशकापासून पालखीमधून निघते. विशेष म्हणजे या सार्वजनिक मंडळाची मुर्ती ही अर्धा फूटाची आहे. त्यामुळे  ख-या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सवाचा अर्थ हा घोंगडे गल्लीतील गणेशोत्सवास समजला गेला असल्यांचे पंढरपूरकर मानतात.  याचबरोबरीने पाहीले तर येथील चौफळा  तरूण मंडळाने काही वर्षापूर्वी पंढरीत वर्षभर देखिल गणेश दर्शन व्हावे. या हेतून एक पितळेची मुर्ती स्थापन करून तिचे मंदिर उभे केलेले आहे. त्यामुळे  वर्षभर गणेशांचे दर्शन होत असते. गणेशोतसव आणि पंढरपूरी भत्ता  पंढरपूर आणि ‘ भत्ता ‘ हा साहित्यिंकांमधे खूपच प्रसिध्द आहे. पु. ल. देशपांडे यांना तर कायमच पंढरपूरात आल्यावर भत्ता लागत होता. भत्ता म्हणजे भटटीतील गरम चुरमुरे , शेंगदाणे , डाळे  असा मिक्स खाण्याचा पदार्थ  असतो. याचबरोबर येथील पंढरपूरी चिवडयांला देखिल भत्ता म्हणतात. असाच भत्ता हा साक्षात पु.ल. देशपाडे यांयासमवेतच भारतरत्न पंडीत भीमसेन जोशीना  देखिल आवडत असे.  तसेच पंढरपूरचा भत्ता आणि चिवडा याबाबत प्रख्यात साहित्यिक द. मा. मिराजदार यांच्या साहीत्यात देखिल आणि त्यांच्या फळीवरच्या  किस्स्यात देखिल संदर्भ आलेले आहेत. त्यामुळे  पंढरपूरी भत्ता हा प्रसिध्द असताना दिसून येतो.  पंढरपूरात भत्ता खाण्यासाठी किंवा चिवडा खाण्यासाठी कुठल्याही मुहुर्ताची आवश्यकता लागत नाही. यामधे येथील उत्सवामधे तर भत्ता हा ‘ खिरापत ‘ म्हणून अग्रभागी असतो . याचबरोबरीने गणपतीमधे देखिल भत्ता हा गणपती बाप्पास नैवेद्य म्हणून दाखविला जातो. त्यामुळे  दररोज गणेशोत्सवामधे गणेशभक्तांना पंढरपूरी भत्ता हा असतोच असतो. त्यामुळे  पंढरपूरच्या गणेशोत्सवाचा इतिहास लिहत असताना. तो ‘ पंढरपूरी भत्ता ‘ शिवाय पूर्ण होउ शकत नाही.     गणेशोत्सव म्हटला तर कायमच पुण्यांचे गणपती , कोकणातील गणपती किंवा मुंबईचे गणपती आठवले जातात. मात्र याहीपेक्षा एका वेगळया पध्दतीने भागवत धर्माच्या संस्कारातून साकरला जाणारा पंढरपूरचा गणेशोत्सव हा अनोखाच असल्यांचे दिसून  आलेले आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions