पुणे : गणेशोत्सवाचे वेळी लाऊड स्पिकर, डी.जे. व डॉल्बी सारख्या साधनांचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांना ध्वनी प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागतो. पुणे ग्रामीण जिल्हा हद्दीत राहाणाऱ्या नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाबाबतची तक्रार नजीकच्या पोलीस स्टेशनला फोनव्दारे, ईमेलव्दारे द्यावी. तसेच पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष येथे क्रमांक 100 व व्हॉटस्अप क्रमांक 9422405421 याव्दारेही तक्रार देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
पुणे ग्रामीण जिल्हयाच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रार कोणाकडे द्यावी हे माहिती व्हावे याकरीता पुणे ग्रामीण जिल्हयातील 36 पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.
प्राधिकृत करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी यांची माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाची वेबसाईट puneruralpolice.gov.in यावर अपलोड करण्यात आलेली आहे. तसेच ती जिल्हाधिकारी पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे, पुणे जिल्हयातील 2 नगरपालिका व 11 नगरपरिषदा यांच्या वेबसाईट व वॉर्ड कार्यालयात प्रसिध्दी करीता पाठविण्यात आलेली आहे, असेही पुणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकांनी कळविले आहे.
ध्वनीप्रदूषणाबाबत तक्रारी देण्याकरीता सुविधा उपलब्ध
Team TNV August 19th, 2017 Posted In: Pune Express
Team TNV