किशोर राणे
६० वर्षापूर्वीपर्यंत २५० टनापर्यंत गलबते विनासायास सर्जेकोटच्या बंदरात ये-जा करत असत. कालांतराने हे बंदर गाळाने भरत गेले. बोट वाहतूक बंद झाली. गलबते थांबली आणि किनारा ओस पडला. सर्जेकोटच्या बंदराचे वैशिष्टय़ म्हणजे मुख्य बंदरापासून ८०० फूट आत सागरी भिंत आहे. यामुळे कितीही मोठया लाटा आल्या तरी पहिल्या सागरी भिंतीला धडकतात आणि शांत होत पुढे विसावतात. यामुळे बंदरातील कोणत्याही नौकेला धोका पोहोचत नाही. या बंदराच्या समोरच भव्य कडा पसरला आहे. त्याला ‘खडककवडा’ असे ग्रामस्थ म्हणतात याच बंदराच्या पश्चिमेला भूईकोट किल्ला आहे. जो शिवकालीन आरमाराची तेजोमय गाथा सांगत असतो. या किल्ल्यांवर झालेले तोफांचे आघात आणि युद्धाच्या खुणा आजही पाहायला मिळतात. या बंदराला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने नवी झळाळी आली आहे. सर्जेकोट आता भक्कम झाले आहे. ६० वर्षापूर्वीपर्यंत २५० टनापर्यंत गलबते विनासायास सर्जेकोटच्या बंदरात ये-जा करत असत. कालांतराने हे बंदर गाळाने भरत गेले. बोट वाहतूक बंद झाली. गलबते थांबली आणि किनारा ओस पडला. सर्जेकोटच्या बंदराचे वैशिष्टय़ म्हणजे मुख्य बंदरापासून ८०० फूट आत सागरी भिंत आहे. यामुळे कितीही मोठया लाटा आल्या तरी पहिल्या सागरी भिंतीला धडकतात आणि शांत होत पुढे विसावतात. यामुळे बंदरातील कोणत्याही नौकेला धोका पोहोचत नाही. या बंदराच्या समोरच भव्य कडा पसरला आहे. त्याला ‘खडककवडा’ असे ग्रामस्थ म्हणतात याच बंदराच्या पश्चिमेला भूईकोट किल्ला आहे. जो शिवकालीन आरमाराची तेजोमय गाथा सांगत असतो. या किल्ल्यांवर झालेले तोफांचे आघात आणि युद्धाच्या खुणा आजही पाहायला मिळतात. या बंदराला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने नवी झळाळी आली आहे. सर्जेकोट आता भक्कम झाले आहे.
तारू पसरून अवजारे भेदित सिंधु जायतत् शिखरावर मुर्तन तू दिसशी काय?या ओळीचा अर्थ काय? हे आजच्या मुलांना सांगता येणार नाही. कारण ‘तारू’ म्हणजे काय हे मुलांना माहिती नाही. कवी केशवसुतांच्या निशाण या कवितेतील या ओळी. गलबताच्या प्रवासावर अधोरेखित करण्यात आल्या आहेत. मात्र, आज गलबतांचे स्वरूप बदलले आहे. ‘तारू’ गलबत ही चीजच आता अस्तित्वात नाही. तेव्हा तारूचे चित्र काढून अशा प्रकारचे तारू होते. त्याला शिडे होती, सुकाणू होते. त्या सुकाणूंवर उंच काठीला निशाण म्हणजे ब्रिटिशांच्या कारकिर्दीत युनियनच्या आणि स्वातंत्र्यानंतर तिरंगी राष्ट्रध्वज लावला जायचा. आज तारूची गलबते जशी गायब झाली, तसा बंदरांचा गत इतिहासही काळाच्या पडद्याआड जातो आहे. एकेकाळी या बंदरांवर अहोरात्र गजबज असायची. बंदरांमधून सोन्याचा धूर निघायचा असे कोणी सांगितले तर गोष्टीच्या पुस्तकात वाचल्याप्रमाणे मुले ऐकत राहतात. आज कोकणच्या किनारपट्टीचे स्वरूप बदलले. एकेकाळी आरमाराचा मोठा तळ असणारे सर्जेकोटही यातून सुटले नाही. सर्जेकोट म्हटल्यावर डोळय़ांसमोर उभा राहतो विशाल सागर आणि बंदरापासून काही मिनिटांच्या अंतरावर असणारा सर्जेकोटचा किल्ला..,सागरकडा.. आणि सर्जेकोटचे अद्ययावत झालेले बंदर. सर्जेकोट बंदराला नवी झळाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने सत्यात आली. विकासाची धमक असलेल्या या नेत्याने दूरदृष्टीने या बंदराला नवे तेज दिले आहे. वैशिष्टय़पूर्ण आणि सुरक्षित बंदर म्हणून सर्जेकोटची गत झळाळी पुन्हा येऊ लागली आहे. या बंदराचा वेध घेताना कोकणचा अमूल्य ठेवा येथे पाहायला मिळतो. मिर्याबांदा ही रेवंडी गावची एक वाडी. १९७२ मध्ये मिर्याबांद्याला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळाली आणि वाडीला गावाचे स्वरूप प्राप्त झाले. मिर्याबांदा येथेच सर्जेकोट बंदर येते. कालावलीची खाडी सहयाद्रीच्या पायथ्याशी उगम पावते. कणकवली ओलांडून मालवण तालुक्यात प्रवेश करून बेळणे, मालोंड, मसुरे, कालावलीमार्गे ती सर्जेकोटला पोहोचतअरबी समुद्राच्या कुशीत शिरते. सर्जेकोट हे ऐतिहासिक सुरक्षित बंदर असून गेले तीनशे-साडेतीनशे वष्रे सर्जेकोट-मालोंड अशी जलवाहतूक सुरू होती. छत्रपतींनी शिवकालात मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केली आणि नाविक तळ उभारला. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वास्तूशांतीच्यावेळी महाराजांनी कोळंब खाडीच्या पलीकडे मिर्याबांद्याच्या हद्दीत गोरख चिंचेचे एक झाड लावण्यास दिले होते. त्याकाळी कोळंबचे तरवाळ हा पाणथळ भाग असल्यामुळे सर्जेकोट बंदराला जाणाऱ्या पायवाटेवर हे झाड लावण्यात आले होते. ज्येष्ठ मंडळी सांगतात की, या झाडाचा घेर ३० फुटांचा होता. १९६१ मध्ये वादळात हे झाड मुळासकट उपटले. शिवरायांच्या हस्तस्पर्शाने पुनीत झालेल्या या झाडाची आठवण कायम राहावी म्हणून एक चिंचेचे झाड पुन्हा लावण्यात आले, ते आजही दिसते आहे. या झाडाचा घेर आज बारा फुटांचा आहे. सर्जेकोट खाडीच्या दक्षिणेकडे जांभ्या दगडाचे कातळ होते. या कातळावर शिवाजी महाराजांनी भूईकोटची उभारणी केली. सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुमारे १ हजार ४०० नाविकांची वस्ती असल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात मिळतो. या किल्ल्यावर शत्रूचा हल्ला झाल्यास मराठय़ांचा नाविक तळ उद्ध्वस्त होण्याचा धोका होता. यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्यापासून सुमारे दीड मैल अंतरावर सर्जेकोटच्या परिसरात भूईकोटाच्या आश्रयाने महाराजांनी ३ हजार नाविकांचे राखीव सैनिक ठेवले होते. तरांडी, गुराबा, गलबते आदी नौका सर्जेकोट बंदरापासून तोंडवलीच्या व्याघ्रेश्वरापर्यंत ठेवलेल्या असायच्या. ६० वर्षापूर्वीपर्यंत २५० टनापर्यंत गलबते विनासायास सर्जेकोटच्या बंदरात ये-जा करत असत. कालांतराने हे बंदर गाळाने भरत गेले. बोट वाहतूक बंद झाली. गलबते थांबली आणि किनारा ओस पडला. सर्जेकोटच्या बंदराचे वैशिष्टय़ म्हणजे मुख्य बंदरापासून ८०० फूट आत सागरी भिंत आहे. यामुळे कितीही मोठया लाटा आल्या तरी पहिल्या सागरी भिंतीला धडकतात आणि शांत होत पुढे विसावतात. यामुळे बंदरातील कोणत्याही नौकेला धोका पोहोचत नाही. या बंदराच्या समोरच भव्य कडा पसरला आहे. त्याला ‘खडककवडा’ असे ग्रामस्थ म्हणतात. या कडयाच्या सभोवती भरपूर कालवे मिळतात. सर्जेकोट किल्ला हा विजापूरच्या अदिलशहाच्या काळाचे अस्तित्व दाखवत होता. शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केली. हा किल्ला कालावल नदीच्या मुखावरील मोक्याच्या जागी आहे. शिवकालात खांडाळेकर घराणे महसूल वसुलीचे काम करायचे. त्यांच्याकडे सर्जेकोट किल्ला देण्यात आला होता. या किल्ल्याचा अंमल कांदळगाव, मसुरा, मालोंडच्या परिसरात असायचा. आजही सर्जेकोट भूईकिल्ल्यामध्ये खांडाळेकरांच्या वंशजांचे वास्तव्य आहे. किल्ल्याची रचना मन मोहून टाकणारी आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १ हेक्टर आहे. किल्ल्याचे बांधकाम दगड व मातींचे आहे. प्रवेशद्वाराशिवाय कुठेही चुना वगैरे वापरलेला नाही. हा किल्ला सतराव्या शतकात बांधलेला असावा, असे खांडाळेकर घराण्याचे वंशज मोहनदास खांडाळेकर सांगतात. या किल्ल्याच्या सभोवती किल्ल्याच्या रक्षणासाठी सुमारे १० फूट खोल व १० फूट रुंदीचा खोल खंदक होता. किल्ल्याच्या आत बालेकिल्ला आहे. शिवाय आत पाण्यासाठी विहीर, तुळशी वृंदावन आहे. सुरंग, वड, पिंपळ, ओवळ अशा वनश्रींची आत दाटी आहे. खजिन्याचीही येथे जागा पाहायला मिळते. या किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर पूर्वी मारुतीची मातीची घुमटी होती. सिंधुदुर्गाच्या दरवाजावर मारुती आहे तसा. सर्जेकोटचे वैशिष्टय़ म्हणजे सर्जेकोट पिरावाडी येथे पीराचा दर्गा आहे; पण सर्जेकोटमध्ये एकही मुसलमान कुटुंब नाही आणि या दग्र्याला हिंदू आणि पंचक्रोशीतील मुस्लीम बांधव नतमस्तक होतात. सर्जेकोट बंदराची प्रसिद्धी ही पूर्वीपासून आरमारी व व्यापारी बंदर म्हणून होती. सर्जेकोट बंदरातून कालावलीच्या खाडीत मोठा व्यापार चालत असे. पूर्वी सर्व व्यापार जलमार्गाने चालत असे. सर्व प्रकारचा माल मुंबईहून गलबताने यायचा. व्यापाराच्या दृष्टिकोनातून सर्जेकोट हे सुरक्षित बंदर असल्यामुळे सर्जेकोट ही घाऊक मालाची मोठी बाजारपेठ मानली जाई. १९६० पर्यंत ट्रक वाहतूक नव्हती तोपर्यंत दिवस-रात्र येथे वर्दळ असायची. रॉकेलचे पॅक डबे भरून गलबताने यायचे. त्यावेळी टँकर नव्हते. या रॉकेलमध्ये हत्ती छाप, चक्रछाप, सूर्य छाप डबे यायचे व राणी छाप डबे हे तांबडे रॉकेल घरांतल्या दिवटय़ांसाठी वापरायचे. हे रॉकेलचे डबे मुंबईहून गलबताने यायचे. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी तुळशीच्या लग्नासाठी मसुरा, बांदीवडे, कोईल भागातून ऊस मोठया प्रमाणात सर्जेकोट बंदरातून मुंबईस गलबताने जायचा. त्याची सुरुवात दसऱ्यापासून व्हायची. सर्जेकोट या ऐतिहासिक बंदरात सन १९३० ते १९६० ही वष्रे फार भरभराटीची होती. या बंदरात सुमारे १०० गलबते होती. एकएका मालकाची दोन ते चार गलबते होती. त्यावेळी असे सांगतात की, मृगाला वादळी हवामानामुळे किना-यावर जहाजे काढून झापांनी शाकारत. भर पावसात कुणालाही श्रीदेवी भद्रकालीच्या देवळात दर्शनास जायचे असल्यास छत्री शिवाय जाता येत असे. सर्जेकोट ते भद्रकालीचे देऊळ सुमारे पाऊण मैल अंतर या शाकारलेल्या जहाजांच्या आडोशाने पावसात भिजल्याशिवाय प्रवास व्हायचा. एवढया दाटीने किनाऱ्याला गलबते काढलेली असत. माल वाहतूकही मोठया प्रमाणात या बंदरातून होत असल्याच्या नोंदी आढळतात. आज ज्या ठिकाणी सर्जेकोट खाडीत लॉन्ची, पाती, पावण लहरींवर दिमाखात डोलताना दिसतात. याच ठिकाणी पन्नास ते छप्पन्न गलबते शिडात वारा भरून ऐटीत हालताना दिसायची. त्यांनाच तारव असं संबोधले जायचे. या महाकाय तारवांपुढे छोटे-मोठे पगार, ऊंडालीच्या होडया खुजा वाटायच्या. मिर्याबांद्याचे जोशी, देऊलकर, सावजी, कुर्ले, मायबा, आडकर, धुरी, खवळे, रेवंडीचे तोंडवळकर, कांबळी, कालावलीचे टिकम, मसुरेचे खोत, बिलये या घराण्यांचा गलबतांचा मोठा व्यवसाय चालायचा. आज सर्जेकोटला नवी झळाळी मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सर्जेकोट बंदर सुरक्षित बंदर म्हणून सेवेत सज्ज आहे. गतकाळ जागा झाला.. सर्जेकोट किल्ला, समुद्र आणि कालावल खाडी असा त्रिवेणी संगम सर्जेकोटला लाभला आहे. हा संगम पाहणे म्हणजे निसर्गाची अपूर्वाई अनुभवण्यासारखेच आहे. या गावातील सर्जेकोट बंदराचा नारायण राणे यांनी विकास केल्याने इथल्या पर्यटनाला चार चाँद लागले आहेत. सर्जेकोटहून होडीने तळाशीललाही जाता येते. असा प्रवास करताना पाण्याशी संवाद साधता येतो आणि निसर्ग डोळयात किती आणि कसा भरू असे होऊन जाते. सुसज्ज असे हे तळकोकणातील पहिलेच बंदर आहे. बंदरावर थेट होडय़ांमधून ट्रकमध्ये मासळी चढविता येते, शिवाय सागरातील कोणत्याही आक्रमणाला तोंड देण्यास ते समर्थ आहे. मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथून सुमारे चार किलोमीटरवर सर्जेकोट गाव आहे. येथेच आपल्याला हे इतिहासाचे साक्षीदार भेटतात.
सर्जेकोट किल्ला इतिहासाचा अजोड साक्षीदार आहे. या किल्ल्यात भ्रमंती करतात. पावलोपावली हे इतिहासातील मोहरे दिसतात. या तटबंदीवर लक्ष वेधून घेते ते शमीचे झाड.. असे म्हणतात शिवकालापासून हा शमी वृक्ष येथे विस्तारलेला आहे. या किल्ल्याला थेट प्रदक्षिणा घालणे शक्य नाही मात्र सर्जेकोटचा इतिहास ऐकताना रोम रोम पुलकीत होतो.