पुणे : ‘पर्यावरण शास्त्र विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा, संशोधनाचा उपयोग नद्यांच्या शुद्धीकरणासाठी करावा. प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करून जलसेवक व्हावे ‘, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी केले.
जलबिरादरी’ चे अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह यांच्या प्रेरणेतून तसेच वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलबिरादरी आयोजित ‘नमामि चंद्रभागा ‘ जलसाक्षरता यात्रेदरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागात जलसाक्षरता विषयावर आयोजित विद्यार्थ्यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम गुरुवारी सकाळी विद्यापीठात झाला.
यशदा ‘ चे आनंद पुसावळे,जलबिरादरीचे संघटक सुनील जोशी, यात्रा समन्वयक नरेंद्र चुघ, प्रा. प्रभाकर देसाई, अनील पाटील, सुहास पटवर्धन , विनोद बोधनकर, डॉ. सतीश चव्हाण, संदीप चोडणकर उपस्थित होते. वन विभागाचे व्ही.व्ही. शिंदे, एस.सी. कुमकुर, एम.टी. मेरगेवाड , उष्प्रभा पागे, शैलजा देशपांडे उपस्थित होते.
‘जलरक्षण आणि नदी शुद्धीकरण मोहिमेत विद्यापीठ आपले योगदान देईल’ असेही डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
विविध महाविद्यालयातील विद्यार्थांनी आपापल्या गावच्या नदीची सद्यस्थिती सांगीतली. नदी सुधारणांसाठी कार्यदल स्थापन करण्यात आले.
विनोद बोधनकर यांनी सांगरुण गावातील प्लास्टिकमुक्तीचा प्रयोग, तर संदीप चोडणकर यांनी पंचगंगा शुद्धीकरणाचे अनुभव सांगितला. ‘ नदी बाबतीत सजगता वाढवावी, त्यासाठी नदी आपली वाटली पाहिजे आणि निर्णय प्रक्रियेत युवा पिढीचा सहभाग वाढला पाहिजे असे प्रतिपादन सुनील जोशी यांनी केले.
डॉ. सुरेश गोसावी यांनी स्वागत केले, डॉ. प्रभाकर देसाई यांनी आभार मानले.