पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड पॉलिटेक्नीक महाविद्यालयाला ‘सर्वेाकृष्ट विद्यार्थी चॅप्टर’ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
रिजनल इन्स्टिट्युट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आणि युएसटी मेघालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुवाहाटी, आसाम येथे घेण्यात आलेल्या 20 व्या आयएसटीई राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेत महाराष्ट्र आणि गोवा विभागातून पिंपरी चिंचवड पॉलिटेक्नीक विद्यालयाची प्रथम क्रमाकांसाठी निवड करण्यात आली.
नवी दिल्ली आयएसटीईचे अध्यक्ष प्रा. प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पॉलिटेक्नीक विद्यालयाच्या प्राचार्या व्ही.एस.ब्यकॉड आणि प्रा. व्ही.एस. खरोटे चव्हाण यांनी पारितोषिक स्विकारले. यावेळी प्रमुख पाहुणे युएसटीएम विद्यापीठाचे कुलगुरु एम. हक, उपकुलगुरु प्राध्यापक अमरज्योती चौधरी, आयएसटीईचे उपाध्यक्ष डॉ. बाबारंजन शर्मा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे सचिव व्हि.डी. वैद्य, एआयसीटीईचे सल्लागार प्रा. डी. एन. मालखेडे आदी उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष 2016 – 17 मध्ये केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल महाराष्ट्र आणि गोवा विभागातून ‘सर्वेाकृष्ट विद्यार्थी चॅप्टर’हा पुरस्कार विद्यालयाला प्रथमच मिळाला आहे. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ.गिरीश देसाई, प्रशासकीय अधिकारी पद्माकर विसपुते यांनी विद्यालयाच्या प्राचार्या व्ही.एस.ब्यकॉड यांचे व प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.