पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) माहिती तंत्रज्ञान विभागात शहरातील पहिल्या ‘फॉस’ सेंटरचे उद्घाटन सीडॅकचे तांत्रिक अधिकारी चंद्रकांत दुधटमल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुंबई आयआयटीच्या समन्वयक विद्या कदम, प्राचार्य डॉ. अ.म. फुलंबरकर, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे, विभाग प्रमुख प्रा.डॉ. स्वाती शिंदे आदी उपस्थित होते.
या सेंटर विषयी माहिती देताना प्राचार्य डॉ. अ.म. फुलंबरकर यांनी सांगितले की, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आयसीटी धोरणानुसार आणि मुंबई आयआयटीच्या सहयोगाने स्पोकन ट्युटोरीयल अंतर्गत पीसीसीओईच्या हे सेंटर उभारण्यात आले आहे. या ‘फॉस’ (FOSS – FREE OPEN SOURCE CENTER) सेंटरमध्ये पिंपरी चिंचवड शहरात शिकणा-या अभियांत्रिकीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मोफत सर्व सुविधा मिळणार आहेत. त्याचा लाभ घेणा-या यशस्वी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रमाणपत्र देखिल देण्यात येईल. यामध्ये ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या सहाय्याने कॉम्प्युटरच्या सी, सी++, जावा, पायथॉन, पीचपी, लिनकम, लायब्ररी ऑफीस, स्कायलॅब यासारख्या अनेक सेल्फ लर्निंग प्रोग्रॅमींगचा अभ्यास करता येईल. अशी माहिती प्रा. फुलंबरकर यांनी दिली.
यावेळी प्रा. स्वाती शिंदे यांनी फॉस सेंटरच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या माहिती तंत्रज्ञान साक्षरता अभियानाची माहिती दिली. हे सेंटर उभारण्यासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ.गिरीश देसाई यांनी मार्गदर्शन केले.
सुत्रसंचालन प्रा. वैशाली कुल्लोली, आभार प्रा. सचिन जाधव यांनी मानले.