पुणे – मध्य रेल्वेअंतर्गत येणार्या पुणे विभागातील पुणे-जबलपूर विशेष रेल्वेला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वेच्या वतीने घेण्यात आला आहे. 01655 पुणे-जबलपूर विशेष रेल्वे दि. 7 नोव्हेंबर ते 2 जानेवारी दरम्यान पुण्यातून दर मंगळवारी सकाळी 10.45 वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी 6.15 वाजता जबलपूर येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे 01656 जबलपूर-पुणे विशेष रेल्वे दि. 5 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान जबलपूर येथून दर रविवारी सायंकाळी 7.30 वाजता सुटून पुण्यात दुसर्या दिवशी दुपारी 2.05 वाजता पोहोचणार आहे. या रेल्वेला दौंड, नगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, मदन महल येथे थांबा देण्यात आला आहे. एक वातानुकूलित 2 टियर, चार वातानुकूलित 3 टियर, दहा शयनयान, 2 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे या रेल्वेला जोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे-जबलपूर विशेष रेल्वेला मुदतवाढ
Team TNV November 2nd, 2017 Posted In: Pune Express
Team TNV