पुणे ते वाघा बॉर्डर सायकल मोहिम

December 13th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

 
पुणे –  माणसं पोट भरण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करातात आणि काही माणसं ते करुन मन भरण्यासाठी साहसी मोहिम करतात. असेच पुणे – पिंपरी चिंचवड मधील १० तरुण म्हणजेच ‘मराठा वॉरियर्स टीम’ एकत्र येऊन एका अनोख्या सायकल मोहिमेवर जाणार आहेत. 
 
भारतीय सेना बॉर्डरवर तैनात असते म्हणून आपण सगळे शांतपणे जगू – झोपू शकतो. त्यांना कृतज्ञता म्हणून ‘मराठा वॉरियर्स’ पुणे ते वाघा बॉर्डर अशी सायकल मोहिम करणार आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व पंजाब अशा चार राज्यातून १८ दिवस प्रवास करुन १० सायकलस्वार २००० किमी पूर्ण करणार आहेत. त्यांच्या मार्गावरील शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन तरुणांना भारतीय सेना मधील संधी यावर प्रबोधन कराणार असून सायकल व आरोग्याचे महत्व पटवून देणार आहेत. 
 
यापूर्वी या टीममधील अनेक लोकांनी साहसी प्रकार/मोहिमा केल्या असून यंदा ते साकलवर प्रथमच चालले आहेत. राम फुगे, निलेश धावडे, प्रज्ञेश मोळक, प्रशांत जाधव, संतोष दरेकर, बजरंग मोळक, विजय हरगुडे, संदीप शिंदे व आठ वर्षीय अंशुमन धावडे अशी ही टीम आहे. गेली चार महिने संपूर्ण टीम सराव करत आहे. 
 
मोहिमेची प्रारंभाचा कार्यक्रम गुरुवार दि. 14 डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ८ वाजता अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे खासदार संभाजीराजे छत्रपती (कोल्हापूर) यांच्या हस्ते Flag Off होणार आहे. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे व सदन कमांडचे प्रमुख संजीव कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार आहेत. तरी या प्रारंभाच्या

कार्यक्रमासाठी पुणेकर व पिंपरी चिंचवडकरांनी उपस्थित राहवे असे आव्हान ‘मराठा वॉरियर्स’ टीमने केले आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions