पुणे – वीजबिलांचा तपशील व इतर माहिती वीजग्राहकांच्या मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे महावितरणकडून पाठविण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या 21 लाख 77 हजार वीजग्राहकांना ही सेवा सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, वीजग्राहकांनी मागणी केल्यास त्यांना मराठी भाषेतून ‘एसएमएस’ उपलब्ध होणार आहे.
पुणे परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीत 25 लाख 59 हजार वीजग्राहक आहेत. त्यापैकी 21 लाख 77 हजार वीजग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली आहे. तर 1 लाख 12 हजारांपैकी 67,755 कृषीपंपधारकांनी तसेच इतर 13752 पैकी 10457 वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे.
सद्यस्थितीत ‘एसएमएस’द्वारे ग्राहक क्रमांक व बिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर, विविध कारणांमुळे मीटर रिडींग घेता न आल्यास ग्राहकांनी महावितरण मोबाईल अॅपद्वारे हे रिडींग पाठविण्याची विनंती तसेच तसेच तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येत आहे. याशिवाय आता ‘एसएमएस’द्वारे मिळालेल्या वीजबिलाच्या तपशिलावरून वीजग्राहकांना देयकाचा भरणा करणे शक्य झाले आहे. महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात जाऊन ‘एसएमएस’ दाखवून वीजबिलाचा भरणा करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. विशेष म्हणजे मराठी भाषेतूनही ‘एसएमएस’ची सेवा महावितरणने सुरु केली आहे. ‘एसएमएस’ची भाषा बदलण्यासाठी मराठीसाठी MLANG (ग्राहक क्रमांक) 1 तर इंग्रजीसाठी MLANG (ग्राहक क्रमांक) 2 असे टाईप करून 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा लागेल.
पुणे परिमंडलातील 21.77 लाख वीजग्राहकांना ‘एसएमएस’ सेवा
Team TNV August 11th, 2017 Posted In: Pune Express
Team TNV