पोलादपूर धरणांसाठी भूसंपादन: कोतवाल, बोरघर, ढवळी धरणांंचा समावेश

August 17th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील कोतवालसह बोरघर आणि ढवळी धरणांच्या भूसंपादनासाठी राज्याचे जलसंपदामंत्री राम शिंदे भूमी अधिग्रहणाचे आदेश देत तब्बल १२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.पोलादपूरातील कालवली धरणाच्या कामाला २००० साली सुरूवात झाली. तेव्हा स्थानिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आले नव्हते. माहितीचा अधिकारात केलेल्या पाठपुराव्यात हे धरण हेटवणे मध्यम प्रकल्प कामार्ली-पेण या कार्यालयामार्फत सुरू झाले असून वनविभागाने या धरणासाठी २ सप्टेंबर २०१४ रोजीच्या पत्रान्वये सशर्त परवानगी दिल्याची पण माहिती प्राप्त झाली आहे. काही शेतकर्‍यांनी परिसराला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होऊन दुबार शेती होऊ शकेल, या वेड्या आशेपोटी धरणासाठी अर्धीअधिक जमीन करण्याकामी सहकार्य केले.
२००० ते २००३ पर्यंत धारवली कालवली धरणातील मातीबंधारा, डबराचे पिचिंग, जॅकवेलची काँक्रीटमध्ये उभारलेली टाकी ही सर्व कामे अपूर्णावस्थेत ठेऊन या प्रकल्पाचे काम गुंडाळण्यात आले. मातीबंधार्‍याच्या भरावाचे काम करून हे धरण बारगळले. तब्बल ३ कोटी ४५ लाख ४१ हजार रूपये खर्च होऊनही या धरणात कधीही पाणी साठले नाही आणि त्यामुळे दुबार पिकाचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने अद्याप मोबदलाही न मिळालेल्या धरणग्रस्त शेतकर्‍यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.
देवळे लघुपाटबंधारे योजनेचे काम ब-१ निविदांवर तीन टप्प्यांत व्ही.एस.हांडा आणि आर.के.कन्स्ट्रक्शन या पुणे येथील कंपन्यांना देण्यात आले. या कामाची सुरूवात मार्च १९९७ मध्ये झाली. मात्र, बुडीत क्षेत्रातील शेतकर्‍यांना भूसंपादनाची रक्कम न मिळाल्याने तसेच भूसंपादनात जमिनीचा दर कमी लावल्याने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी १९९८ मध्ये योजनेचे काम बंद केले होते. या देवळे लघुपाटबंधारे योजनेच्या धरणातून उजवा तीर कालव्याच्या कामाचे अंदाजपत्रक २००४-०५ ची दरसूची वापरून ६१ लाख ५८ हजार २०१ रूपये करण्यात आले होते. तर डाव्या तीर कालव्याचे अंदाजपत्रक २१ लाख १२ हजार ३५५ रूपये करण्यात आले होते.
पावसाळ्यानंतर तीनही धरण प्रकल्पांचा शुभारंभ
सध्या तालुक्यात रानबाजिरे येथील एमआयडीसीच्या ताब्यातील एकमेव धरण पाणीसाठा करण्यास सक्षम असून कालवली आणि देवळे धरणासाठी शासनाचे कोट्यधी रूपये खर्च होऊनही पाणीसाठा होत नसल्याने भूसंपादनासाठी शेतकरीवर्गाचा निरूत्साह दिसून येत आहे. अलिकडेच, लोहारे येथेही सुरू झालेल्या धरण प्रकल्पासाठी भूसंपादनकामी प्रचंड निरूत्साह दिसत असताना आ.प्रवीण दरेकर यांनी या तीन धरण प्रकल्पांसाठी स्थानिक लोकांना अनूकूल करून पावसाळ्यानंतर या तीनही धरण प्रकल्पांचा शुभारंभ करण्या ठरविन्यात आले आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions