पुणे – समस्त हिंदू आघाडी, येरवडा आणि समस्त शिवभक्त मित्र परिवार यांच्यावतीने येरवडयातील प्राचीन शिवतारकेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आदर्श गोभक्त पुरस्कार शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे सनी वर्मा आणि इंद्रायणी स्वच्छता अभियान देहूगावचे सोमनाथ मसुडगे यांना प्रदान करण्यात आला. गोरक्षण करणा-या कार्यकर्त्यांना यातून उर्जा प्राप्त व्हावी, याकरीता कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते.
यावेळी विश्व हिंदू महासंघाचे हेमेंद्र जोशी, समस्त हिंदू आघाडीचे अशोक चव्हाण, आशिष वरगंठे, सूरज रजपूत, किसन पाटील, गणेश ढोकळे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, श्रीफळ आणि उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप होते. उपक्रमाचे यंदा 17 वे वर्ष होते.
भारतीय संस्कृतीतील हिंदू, बौद्ध, जैन, शीख धर्मातील महापुरुषांचे फोटो लावून पूजन करण्यात आले. तसेच त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भगवान शंकराची आराधना करुन ज्ञान, भक्ती, शक्ती प्राप्त व्हावी, याकरीता 108 वेळा मंत्रोच्चार करण्यात आला. याशिवाय पाकिस्तान व चीनकडून होत असलेल्या आक्रमणांमुळे भारतीय जवानांना लढण्यास उर्जा मिळावी, याकरीता कार्यकर्त्यांनी सामुहिक प्रार्थना केली.