पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आंध‘ प्रदेशातील रेनिगुंटा, चितोर येथील ‘ फर्ग्युसन सेंटर फॉर हायर लर् निंग ’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
गुरुवार, ता. १ मार्च रोजी दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह प्रा. आनंद भिडे, प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी यावेळी उपस्थित होते.
फर्ग्युसन सेंटर फॉर लर्निं गमध्ये औद्योगिक सुरक्षितता, बायोइनफरमेटिक्स ऍनेलिसिस व टेस्टिंग आणि वेब डिझायनिंग हे चार अभ्यासक्रम शिकविले जातात. पद्मावती महिला विद्यापीठ व वेंकटेश्वरा विद्यापीठांची मान्यता घेण्यात आलेली आहे. परिसरातील उद्योग-व्यवसायांची गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची निवड करण्यात आली आहे.
आंध्र‘ प्रदेश सरकारच्या निमंत्रणावरून सन २००९ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीने तिरुपतीजवळील रेनिगुंटा येथे ५० एकर जागा विकत घेतली होती. उच्च शिक्षण व संशोधनासाठीचे अभ्यासक्रम याठिकाणी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या जागेचा तीन टप्प्यात विकास करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
त्यानुसार पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. हा संपूर्ण प्रकल्प सौरऊर्जेवर कार्यान्वित आहे. दुसर्या टप्प्याच्या विकासकामांचे भूमिपूजन उद्घाटन समारंभात करण्यात येणार आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वसतिगृह, शिक्षक व शिक्षकेतरांसाठी निवास व्यवस्था आदींचा समावेश आहे.