‘बाल्या नाच’ कोकणी लोककला

January 27th, 2018 Posted In: येवा कोकणात

Team TNV

टिम “येवा कोकणात”

कोकण प्रांतातील निसर्गसौंदर्याप्रमाणे तेथील लोककलाही मनमोहक आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘जाखडी नृत्य’. ‘जाखडी’ मधील खडी म्हणजे उभे राहणे. हा नाच उभ्या.ने केला जातो, म्हडणून त्या स ‘जाखडी’ असे म्हसटले जाते. जाखडीचा आणखी एक अर्थ होतो – ‘जखडणे’. ‘जाखडी’मध्ये नृत्य‘ करणार्यांनची शृंखला तयार केली जाते. जाखडी नृत्यास ‘बाल्या नाच’ असेही म्ह टले जाते. मुंबई त ग्रामीण भागातील शेतकरी घरगड्याचे काम करत असत. त्यांच्या कानात बाली हे आभूषण असे. त्या आभूषणावरुन ते करीत असलेल्यात नृत्याला, ‘बाल्या नाच’ असे नाव पडले. बाल्याे अथवा जाखडी नृत्या स रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी ‘चेऊली नृत्य’ असेही म्हणतात. त्याला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळत आहे.
या कला प्रकाराचा उगम शाहिरी काव्य, तमाशा या लोककलां पासून सुरू झाला. त्यात कलगीवाले व तुरेवाले असे दोन पंथ असतात. बाल्या नाचाला कलगीतुरा किंवा शक्ती-तुर्यालचा सामना असेही म्हणतात. सहाव्या शतकानंतर होऊन गेलेले कवी नागेश यांनी ‘कलगी’ या पंथाची सुरुवात केली. त्यांच्या नावावरुन त्या पंथाला ‘नागेशवळी’ म्हणजेच नागेशाची ओळ किंवा पंथ असेही ओळखले जाऊ लागले. नागेश यांनी कलगी पंथाची स्थापना केल्यानंतर त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला समकालीन कवी हरदास यांनी ‘तुरेवाले’ या पंथाची सुरुवात केली. त्याला हरदासवळी म्हणजेच हरदासाची ओळ किंवा पंथ असेही म्ह टले जाऊ लागले. दोन पंथांपैकी एकाने शक्तीचा (पार्वतीचा) मोठेपणा आपल्या कवितेतून किंवा शाहिरीतून मांडला आणि दुसर्याेने हराचा (शिवाचा) मोठेपणा सांगितला. पुढे, पंथांना ओळखण्याची खूण म्हणून कलगीवाल्यांनी कलगी या चिन्हाचा वापर केला आणि तुरेवाल्यांनी आपल्या डफावर पंचरंगाचा तुरा लावण्याचा प्रघात पाडला. या दोन गटात काव्यात्मक जुगलबंदी रंगते. त्या प्रकारच्या डफ-शाहिरीतून तमाशा हा लोककला प्रकार निर्माण झाला. त्याची कोकणातील आवृत्ती म्हणजे ‘बाल्या नृत्य’.
बाला नृत्यप्रकारात एक-दोन गायक, एक ढोलकी किंवा मृदुंग वादक, एक शैलीवादक, एक-दोन झांजरीवादक व गायकांना साथ देणारे एक-दोन सुरते (कोरस देणारे) असतात. ते सर्वजण मधोमध बसतात आणि आठ ते दहा जण त्यांच्या सभोवती गोलाकार भरजरी कपडे व पायात चाळ बांधून पायांच्या विशिष्ट हालचालींवर नृत्य करतात. प्रथम शक्तीवाले त्यांचे नृत्य सादर करतात. त्यामध्ये ईशस्तवन केले जाते. नर्तक गुंफलेल्या नृत्याच्या वेगवेगळ्या चाली सादर करतात. त्यानंतर गण-गौळण, सवाल-जवाब, साकी, प्रतिस्पर्ध्याच्या चुका काढणारे, भक्तीपर, सामाजिक अथवा सद्यस्थितीसंबंधी माहितीपर गाणी गाऊन त्यावर नृत्य सादर केले जाते. गणात गणपतीला वंदन केले जाते, तर गौळणीत कृष्णाने गौळणींना केलेला इशारा गायला जातो. नृत्यामध्ये सवाल-जवाब स्वरूपाचीही गाणी गायली जातात. तुरेवाले त्यांचा सवाल विचारतात व शक्तीवाले त्यांच्या काव्यातून त्यांना उत्तर देतात.
बाल्या नृत्य श्रावणमास ते दिवाळी या काळात विशेष सादर केले जाते. नाचासाठी ढोलकी, मृदुंग , घुंगरू, झांज, टाळ , बासरी, सनई या वाद्यांचा वापर केला जातो. बदलत्या काळानुसार बाल्यांचे कपडे, म्हटली जाणारी गाणी यात बदल होत गेले. पूर्वी कासोटा बांधून नाच केला जात असे. त्यानंतर नाचणारे धोतर घालू लागले. त्यालसोबत डोक्यालवर पेशवेशाही पगडी आणि कमरेला रंगीत शेला ही जाखडी नृत्या ची वेशभूषा असे. हल्ली रंगेबेरंगी कपडे वापरले जातात.
जोडचाल, एक पावली, दोन पावली, तीन पावली आदी चालींवर जाखडी नृत्य केले जाते. नृत्ये करणा-यांना बाल्या, असे संबोधतात. उजव्या पायात भरपूर घुंगरू बांधले जातात. नृत्याजची रचना प्रामुख्या.ने वर्तुळाकार असते. नृत्य् करताना घुंगरू बाधलेल्याप पायाने ठेका दिल्या मुळे ढोलकी, झांजरी, टाळे च्या आवाजात घुंगरांचा आवाज भर टाकतो. पायातले घुंगरू, गायकाचा उत्सााहपूर्ण आवाज यामुळे नाचणा-यांच्याय अंगी उत्सा ह संचारतो आणि ते गीत-वाद्यांच्यार तालावर आरोळया देऊ लागतात. गाण्या च्‍या मधे ऐकू येणा-या त्याउ आरोळ्यांमुळे सादरीकरणात आणखी रंग भरला जातो. मात्र पायात घुंगरू बांधून नाच करणारे दुर्मीळ आहेत.
गणेशोत्स वाच्याव काळात जाखडी नृत्यन व परंपरेला मोलाचे स्था न आहे. गणेशोत्सयवात जाखडी पथके वाड्यावाड्यांतून बाल्या् नृत्य् सादर करताना दिसतात. चिपळूण तालुक्यामतील अनारी, कुंभार्ली, पिंपळी, टेरव, कामथे, सावडे, गांग्रई, आंबडस अशा गावांतून जाखडी पथके आढळतात. नृत्यत सादर करताना शाहीर नैसर्गिक आपत्ती, तसेच समाजातील विविध समस्यांावर गीते रचतात. नृत्याकच्या वेळी गीते गायली जातात. राधाकृष्णातवर विशेष करून गाणी रचली जातात. वासुदेवाची गाणी, अथवा भारूडा सारख्या् लोकप्रकारांतून केली जाणारी जनजागृती जाखडी नृत्याीतील गीतांतही दिसून येते. जाखडी नृत्याअतील गीतांमध्येय‘गणा धाव रे…’हे गीत विशेष प्रसिद्ध आहे.
बाला नृत्यात गोफ नृत्याचाही समावेश आहे. या नृत्य-गीतांना कृष्णाच्या रासक्रीडांचा पौराणिक संदर्भ आहे. नाचणा-या बाल्यांाचा वेशही कृष्णावप्रमाणे डोक्या-वर मुकुट, दंड आणि मनगटावर बाजुबंद, गळ्यात माळा असा असतो. गोफ नृत्याीचे दक्षिणेकडील ‘पिनल कोलाट्टम्‌’ आणि गुजरातमधील ‘गोफगुंफन’ या नृत्यप्रकारांशी साधर्म्य आढळते.
गोफ नृत्य प्रकारात हातात गोफ घेतलेले बाल्याा नृत्याटसोबत गोफ विणत जातात आणि तेवढ्याच लकबीने तो सोडवतातही. गोफ नृत्यातसाठी नर्तकांची संख्यान समप्रमाणात असावी लागते. चार, सहा, आठ अशा संख्येरने त्यांच्याआ जोड्या असतात. गोफ रंगेबेरंगी साड्या, ओढण्या् अथवा कपड्यांपासून तयार केला जातो. नृत्य सादर करण्यारच्या् जागी, नर्तकांच्या शिरोभागी आढ्याच्यास केंद्रस्थाानी गोफ बांधून त्याेची अनेक टोके अधांतरी सोडलेली असतात. प्रत्येअक बाल्यां एकेक टोक हाती घेतो. त्यानंतर गाण्यााच्याो तालावर आणि ढोलकीच्याे ठेक्याोवर नृत्यत सुरू होते. काही वेळातच, बाल्या नृत्याघची वर्तुळाकार गती सोडून परस्प्रांना सामोरे जाऊ लागतात आणि गोफाची गुंफण सुरू होते. त्यावेळी त्यां ची नृत्या‍ची पद्धत नागमोडी वळणाची असते. अर्ध्याि जोड्या डाव्याो तर उर्वरित जोड्या उजव्याज बाजूने प्रवास करत गोफ गुंफत असतात. गाण्याचची रंगत जसजशी वाढत जाते तसतसा गोफ घट्ट विणला जात असतो. त्या वेळी ढोलकीच्यास ठेक्याचवरील पदन्यारस, परस्पोरांसोबत असलेली सुसुत्रता यांचे फार महत्त्व असते. चुकलेल्या एका पदन्याकसामुळेही गोफाची गुंफण बिघडू शकते. एका टप्यारस् वर, गुंफण पूर्ण होते आणि बाल्या उत्सालहाने नाचू लागतात. अनेकदा, गाण्यांची चाल अथवा गाणे बदलले जाते. एखादे कडवे झाल्या नंतर गोफ सोडवण्या‍चा भाग सुरू होतो. त्या वेळी बाल्याग विरूद्ध दिशेने परस्पबरांना सामोरे जाऊ लागतात आणि विणलेला गोफ तितक्याच लकबीने सोडवला जातो.
गोफनृत्यात अत्यंवत लयबद्धतेने आणि लकबीने गोफ गुंफला आणि सोडविला जातोकाही विभागांत विशिष्ट असे मनोरे उभारले जातात. रत्नािगिरी मध्ये अड्डेरवाले हरी विठ्ठल नावाचे प्रसिद्ध शाहीर होऊन गेले. त्यांची जाखडी नाचाच्या कथेवरील पुस्तकेही प्रसिद्ध होती. पूर्वी केवळ कोकणात असणारे हे नृत्य शहरातही पाहण्याची संधी मिळते. ते नृत्य कोकणी माणसाबरोबर महाराष्ट्रातील सर्व भागांतील लोकांच्या पसंतीस पडले आहे.
सध्या् जाखडी नृत्याचे आधुनिकीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. नृत्याच्या गाण्यांमध्ये अश्लील शब्दांचा वापर वाढला असून नृत्याची परंपरा चुकीच्या मार्गावर नेली जात आहे असे ज्येष्ठांचे म्हणणे असते. नृत्यादमध्येा ईश्व राचे स्मारण आणि भावनिकता यांना स्थाेन होते. त्या जागी जाखडीमध्ये. सिनेमाच्याा गाण्यांनच्यास तालावर गीते गायली जातात. त्यामचबरोबर गाण्यासतून एकमेकांशी अर्वाच्यत भाषेत बोलणे, अश्लीचल गाणी म्हाणणे, आकर्षणासाठी नृत्याजत कसरती करणे, अंगावर विद्युत उपकरणे लावणे, डोंबा-याचे खेळ करत नाचणे, अशा अनेक प्रकारांनी या लोककलेत शिरकाव केला आहे. जाखडी नृत्याच्याु दृकश्राव्य सीडी बाजारात येत आहेत. त्या‍तही चांगल्याी गीतांसोबत थिल्लकर स्वणरूपाची गीते पाहण्याणस-ऐकण्यासस मिळत आहेत. जाखडी लोककलेमधील अश्लीचलता दूर व्हांवी आणि या लोककलेचा पूर्वीचा बाज कायम रहावा यासाठी काही संस्थाव प्रयत्नसशील असल्याचचे दिसते.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions