भारतातील मालमत्तांमध्ये गुंतवणूकीबद्दल यूएईतील अनिवासी भारतीय आशावादी

December 12th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे – रेरा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे मोठ्या प्रमाणात पारदर्शकता, समानता आणि सर्व भागधारकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून यात अनिवासी भारतीयांचाही (एनआरआय) समावेश आहे. या उत्साहाच्या वातावरणाला अनुसरून दुबई येथे ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत क्रेडाईच्या इंडियन प्रॉपर्टी शोमध्ये मोठ्या संख्येने लोकांचा प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात झालेल्या चौकशी आणि नोंदविलेले व्यवहार यातून उत्साहित भावनेचे प्रतिबिंब बघायला मिळते. महाराष्ट्राला प्रचंड संख्येने प्रतिसाद मिळाल्या, तर कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळलाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

“प्रदर्शनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आल्याचे पाहून आम्हाला खरोखर प्रोत्साहन मिळाले आहे. शोच्या तीन दिवसातच हजारो प्रॉपर्टी खरेदीदारांनी प्रदर्शनात गर्दी केली. तसेच “क्रेडाई महाराष्ट्रानेच विविध मालमत्तांच्या संदर्भांत मोठ्या संख्येने चौकशांची नोंदणी केली आहे,” असे क्रेडाई नॅशनलचे कार्यकारी समिती सदस्य श्री. कपिल गांधी प्रचंड प्रतिसादाबद्दल भाष्य करताना म्हणाले.

भारतीय मालमत्तांच्या क्रेडाईच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भारतातील २०० पेक्षा अधिक रेरा मान्यताप्राप्त प्रतिष्ठित बिल्डर्सचा समावेश होता. यात राज्यवार १४ पॅव्हेलियन असून त्यात ६० शहरांतील हजारो मालमत्तांचे प्रदर्शन दाखवण्यात आले. प्रदर्शनातील राज्यवार पॅव्हेलियनमध्ये गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली-एनसीआर, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि गोवा यांचा समावेश आहे.

खरेदीदारांना शिक्षित करणे, मार्गदर्शन करणे आणि माहिती देणे हा या प्रदर्शनाचा हेतू असून यात भारतातील सध्याच्या मालमत्ताविषयक ट्रेंड या विषयावर मालमत्तातज्ञांचे विनामूल्य सेमिनार भारतातील स्थावर-मालमत्तेच्या गुंतवणुकीच्या कायदेशीर बाबी तसेच वास्तु व इंटेरियर सेमीनार यांचाही समावेश होता.

या सर्वांमध्ये क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री. शांतिलाल कटारिया यांच्या सेमिनार मध्ये त्यांनी रेरा, मालमत्ता खरेदीदारांवर त्याचा परिणाम, महत्त्वाच्या तरतुदी आणि ठळक वैशिष्ट्ये या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन राजे दुबई भूमी विभागाचे महासंचालक सुल्तान बट्टी बिन मजरेन, दुबईतील भारताचे वाणिज्य राजदूत विपुल, एनआरआय फोरम कर्नाटकच्या उपाध्यक्षा डॉ. आरती कृष्णा आणि बॉलिवूड अभिनेता भारतीय प्रॉपर्टीचे ब्रँड अॅम्बेसेडर श्री. अरबाज खान यांनी केले. यावेळी क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष श्री. जक्षय शाह, क्रेडाई नॅशनलचे चेअरमन श्री. गीतांबर आनंद, क्रेडाईचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन अध्यक्ष श्री. विपुल ठक्कर, क्रेडाई नॅशनलचे चिटणीस रोहित मोदी, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री. शांतिलाल कटारिया, क्रेडाई नॅशनल युथ विंगचे संयोजक श्री. आदित्य जावडेकर आणि क्रेडाईचे अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनादरम्यान, क्रेडाईने स्मार्ट इंडिया रिएल्टी मीट आणि संयुक्त अरब अमिरात व भारतातील अग्रगण्य विकसक आणि शासकीय संस्थांना पुरस्कृत करण्यासाठी पुरस्कार सोहळा हेही आयोजित केले होते. परिषदेत आणि पुरस्कार समारंभात एकत्र येऊन बँका, दुबई भूमी विभाग आणि युएई चॅनल पार्टनरनी आपला पाठिंबा दर्शविला. संयुक्त अरब अमिरातीत स्थायिक झालेले शेकडो एनआरआय या कार्यक्रमात उपस्थित होते आणि भारतीय रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीत त्यांनी प्रचंड रस दाखविला.

‘एनआरआय’ना येणाऱ्या विविध मालमत्ताविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी क्रेडाईच्या इंडियन प्रॉपर्टी शोमधील ग्राहक तक्रार निवारण मंचही होता.या मंचाने अभ्यागतांना क्रेडाई सदस्य विकसकांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले जेणेकरून कोणत्याही अनैतिक पद्धतींपासून ग्राहक हक्कांचे प्रभावीपणे संरक्षण व्हावे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions