विवेक ताम्हणकर
कारवार, गोमांतक अगदी पुढे रत्नागिरीपर्यंतच्या भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेक “कोंकणी” असा म्हटला जात हूता. पुढे गोया येगळा राज्य झाला आणि कोंकणीक गोयाची राज्य भाषा म्हणान मान मिळालो. पण या काळातंय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत जी भाषा बोलली जात हूती ती कोकणीपेक्षा थोडी येगळीच हूती. पुढे भाषेच्या जाणकारांनी तिका ‘कुडाळी’ असा नाव दिल्यानी. पण या भाषेची मालवणी म्हणान आज पुऱ्या जगभर ओळख झाली. हेचा याक कारण म्हणजे मालवणी मुल्कातलो नटसम्राट मच्छिंद्र कांबळी. मच्छिंदरान मालवणी नाट्कातना या भाषेचो धुमाकूळ अगदी सातासमुद्रापार घातल्यानं आणि मालवणी भाषेक “मालवणी” हि ओळख मिळाली. मालवणी परमान संपूर्ण कोकणात भाषेतले अनेक भेद बघूक मिळतत. भाषेच्या जाणकारांच्या मतानुसार कोकणातल्या तीसाहून अधिक बोलींका कोकणी म्हनाचा लागात. हिच्यात मालवणी हि येगळी बोली आणि स्वताची येक येगळी ओळख निर्माण करून आसा. दक्षिण कोकणातल्या दोडामार्ग सावंतवाडीपासना मालवण, देवगड, फोंडा, वैभववाडी ते राजापूर अशा अरबी समुद्राच्या किनारपट्टीचो भाग आणि गोमांतकातल्या सावंतवाडी तालुक्याच्या सीमेलगतच्या भागात ही बोली बोलली जाता. पुरॊ सिंधुदुर्ग जिल्हो आणि रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागात या बोलीचो प्रभाव आसा. हयच्या रोजच्या जगण्यातली मालवणी आवशी परमाण आसा. अनेक लेखकांनी आपल्या लेखनात मालवणीचो वापर केल्यानी आसा. अनुनासिक उच्चार या ह्या भाषेचा इशेष आसा आणि हेल काढून बोलण्यात भाषेची खरी मजा आसा. येखाद्या देवळात जेव्हा गावकार देवाक गाराना घालता तेव्हा या भाषेचा सामर्थ्य अनुभवूक मिळता. दशावतार हि हयच्या मातयेचो रंग आसलेली आणि गोडी असलेली लोककला मालवणी मुलकात आपला येगळेपण जपान आसा. तश्यो हय बऱ्योच लोककला आसात. तेनी हयची लोकसंस्कृती समृद्ध केल्यानी हा. दशावतार नाटकातला संकासूर या पात्राच्या तोंडची वाक्या मालावणीतच आसतत. बोलण्यातली हुशारी आणि अगदी देवांची पण हजेरी घेणारा या पुराणातला पात्र म्हणजे हयच्या लोकांच्या अनेक पीडयेंच्या इतिहासाच्या रूपाण भाषिक स्वरूपात प्रतिनिधित्व करणारा महत्वाचा पात्र आसा. मालवणी भाषेत घातल्यो जानारयो गाळी अगदी पिरमान घातल्यो जातत. कोकणातलो मोठो अभिनेतो “नाना पाटेकार” हेच्या शब्दात सांगाचा तर, “मालवणी शिवी म्हणजे ओवी” ती घातली नाय तर समोरच्या माणसावर आपला पिरेम नाय असाच समजला जाता. पण या भाषेची एक गम्मत आसा हा, दर बारा मैलार भाषा बदलता म्हणतत तसा माल्वणींचा पण आसा. मात्र माल्वणीतले काही शब्द हयच्या समाजानुसार बदालतत. ब्राह्मणसमाज, सारस्वतसमाज, गाबीतसमाज, कुळवाडी आणि दलितसमाज हेंच्यात मालवणी उच्चारात थोडो बदल जाणवता. हयच्या माणसाच्या बोलण्यावरणा तो खंयच्या भागातलो आसा हेचो अंदाज मालवणी मानसाक अगदी जगाच्या पाठीवर येखादो मालवणी माणूस भेटलो तरी लागता. आता खेड्यात आणि आवाठात शिक्षण पोचला, टीव्ही पोचलो, खेड्यातली माणसा मुंबय, पुणा अशा मोठ्या शहरात कामा-धंद्याक जावंन ऱ्हवाक लागली त्यामुळा हयच्या भाषेतय आता कायकाय नवीन शब्दांनी प्रवेश केल्यानी आसा. मात्र त्याच शब्दांका हयच्या मालवणी माणसान मालवणी करून सोडल्यान आसा. आता याच बघा ना पेन ला प्यान, ब्लॉक ला बलाक हॉस्पिटल ला हास्पिटल, स्कूल ला इस्कुल असे बरेच शब्द मालवणीत आसत. मात्र प्रमाण भाषेनुसार बोली भाषेत पण आता बाकीच्या भाषेतल्या शब्दांचो शिरकाव वाढलो आसा. त्यामुळा भाषेचा नुकसान हुताना दिसता. नुकसानाचा आनखीन याक कारण म्हणजे बोली भाषेक गावंडळ समजणारे लोक. अलीकडे टीव्ही माध्यमात मालवणी भाषेतले कार्यक्रम सुरु झालेत. मुंबय विद्यापीठानं मालवणी भाषेतला साहित्य अभ्यासक्रमात आणल्यान त्यामुळा मालवणी भाषेच्या जपणुकीची एक नवी सुरवात झाली म्हणाक हरकत नाय. मालवणी भाषेनुसार हयच्या मालवणी माणसानीपण आपलो अटकेपार झंडो लावल्यानी आसा. हाल्लीच लिओ वराडकर नांवाचो माणूस आयर्लंड या देशाचो पंतप्रधान झालो. लिओ वराडकर हेंचा मालवण तालुक्यातलया वराड गावात आज पण घर आसा. तेंचे वडील वर्सातना यकदातरी गावक येवन जातत. वेंगुर्ल्यातले डॉ. द्वारकानाथ कोटणीस हेनचा कार्य लय मोठा आसा. चीन जपान युद्धावेळी कोटणिसांका भारत सरकारान चीनमधे धाडल्यान. कोकणातल्या या भल्या माणसान देशाचा आणि आपल्या जन्म भूमीचा नाव इतिहासाच्या पानात लीवला जायत अशी कामगिरी केल्यानं. गोवा मुक्ती संग्राम,संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक प्रश्नात जेंचा नाव पहिला घेतला जाता ते बॅ. नाथ पै हेनी देशाची संसद गाजवल्यानी. असी अनेक मोठी आणि हुशार माणसा कोकणांण दिल्यान. तरीसुद्धा कसलाच मोठेपना या माणसांच्या मनात नाय. म्हणानच म्हणतत “कोकणची माणसा साधीभोळी, काळजात तेंच्या भरली शहाळी” आज महाराष्ट्र आणि गोयात मराठी पत्रकारितेचा मोठा प्रस्थ आसा. येक अभिमानानं सांगाची बाब म्हणजे मराठी भाषेतल्या पत्रकारितेचे जनक म्हनाणं वळाकल्या जाणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांचा गावही कोकणातल्या देवगड तालुक्यातला पोंभुर्ले या आसा. आद्य पत्रकार जांभेकरांचो वारासो कोकणातले अनेक लोक जोपासतत. आज मराठी पत्रकारितेचा प्रस्थ वाढत चालला आसा. मराठी चानला दिवसेंदिवस वाढतहत. मराठी पेपरय काय कमी नायत. साप्ताहिका, पाक्षिका, मासिकानि हयची वाचन संस्कृती समृद्ध करुक मोठो हातभार लावलेलो आसा. हयच्या अनेक विषयांका वाचा फोडूचा काम या माध्यमानी केल्यानी आसा. हयच्या संस्कृती संवर्धनाचा अर्थात जपणुकीचा अनेक दैनिका, साप्ताहिका, मासिका माध्यमा ठरली आसत. आम्हीपण मालवणी भाषेची, हयच्या रांगड्या संस्कृतीची गोडी आसलेला, हयच्या लोकांच्या प्रश्नानका वाचा फोडीत, हयच्या प्रश्नानवर त्रयस्थाच्या भूमिकेतना चर्चा घडवीत असा “द न्यूट्रल विव” या पाक्षिकाचो मराठीतलो अंक “येवा कोकणात” आपल्या समोर घेवण येतव. प्रश्न कोनतोय आसादेत मालवणी माणूस त्रयस्थाच्या भूमिकेतना सोडवूचो नेहमीच प्रयत्न करीत आसता. मालवणी माणसाच्या प्रकुरती गुणधर्माशी आमची नाळ आमच्या नावातनाच आम्ही जोडलं आसवं. आता पुढच्या काळात तुमचा आणि आमचा नाता आणखीन जवळचा व्हयत. भाषेचा संवर्धनकरूयाच, आपल्या संस्कृतीचा रक्षण पण करूया, मात्र प्रगतीच्या वाटेकडे नुसते डोळे कित्याक त्या वाटेचो शोध घेवया ! चला कोकण बदलूया !! नवो देश घडवूया !!!