‘मंत्र’ चा म्युझीक आणि टीजर लॉंच सोहळा उत्साहात संपन्न

March 22nd, 2018 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे – ड्रीमबुक प्रॉडक्शन्सने वेदार्थ क्रिएशन्सच्या मदतीने तयार केलेलाहर्षवर्धन लिखित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट मंत्र’ लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येत असून त्याचा म्युझीक आणि टीजर लॉंच सोहळा मोठ्या उत्साहात मुंबईत पार पडला.

आजच्या काळातला अत्यंत संवेदनशील विषय मंत्र’ या चित्रपटात फारच संतुलितपणे मांडण्यात आला आहे. एका पुरोहिताचा मुलगा पैशासाठी वडिलांचा पेशा स्वीकारतो पण जेव्हा त्याच्या आयुष्यात कर्मकांडाला न मानणारी मुलगी येते तेव्हा मंत्रची कथा घडते. लेखकदिग्दर्शक हर्षवर्धन यांनी मंत्रच्या माध्यमातून आजच्या तरुणाईचा अध्यात्मिक विषयावरचा गोंधळ नेमकेपणाने मांडला आहे.

या चित्रपटात अभिनेता सौरभ गोगटे आणि दीप्ती देवी प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. अभिनेता पुष्कराज चिरपुटकर पुरोहिताच्या भूमिकेत दिसणार आहे तर ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी हे ही एका वेगळ्याच भूमिकेत रसिकांसमोर येणार आहेत. सिद्धेश्वर झाडबुकेसुनील अभ्यंकरधीरेश जोशीराजेश काटकर यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांसोबत शुभंकर एकबोटे आणि सुजय जाधव सारखे तरुण आणि नवे चेहरेही यात पहायला मिळतील. वृषाली काटकरअनुराधा मराठे आणि शुभांगी दामले यांचीही कामं लक्षात राहतील अशी झाली आहेत.

मंत्र’ या चित्रपटला अविनाश – विश्वजित या संगीतकार जोडीने संगीत दिले आहे. चित्रपटात एक वेस्टर्न बाजाचे गाणेपुण्याची ओळख बनलेल्या ढोल ताशाचे एक गाणे आणि एक विरह गीत असे वेगवेगळ्या जॉनरचे संगीत ऐकायला मिळणार आहे. तसेच मंत्रच्या शीर्षक गीतासाठी विनया क्षीरसागर यांनी संस्कृत मध्ये गीत लिहिले आहे. अजय गोगावलेअवधूत गुप्तेरोहित राऊतधवल चांदवडकर आणि विश्वजित जोशी यांनी मंत्र’ साठी पार्श्वगायन केले आहे. पार्श्वसंगीतात ३ संस्कृत काव्यासह पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा उत्कृष्ठ मिलाफ जमवलेला आहे.

या चित्रपटाचे संकलन व स्पेशल इफेक्ट सचिन पंडित यांनी केले आहेततर कलादिग्दर्शन रजनीश कलावंत यांनी केले आहे. या चित्रपटात अत्यंत सुंदर लोकेशन्स वापरण्यात आले आहेतयामध्ये पुण्यातील प्रसिद्ध नागेश्वर मंदिरबलभीम मंदिरसातारा जवळच्या लिंबगाव मंदिराचा सामावेश आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions