पुणे – महालक्ष्मी मंदिर , सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे नवरात्रोत्सव निमित्त आज मंगळवारी सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात पुणे महापालिकेच्या संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, संत नामदेव प्राथमिक विद्यालय , सीताराम आबाजी बिब्वे स्कूल , भामरे स्कूल आदी शाळांमधील 300 मुलींचे कन्यापूजनाचा समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जेमनीस , ज्योत्स्ना म्हाळसे व अश्विनी कुलकर्णी यांच्या हस्ते या मुलींची धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन करण्यात आले.
याप्रसंगी मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अगरवाल , विश्वस्त तृप्ती अगरवाल ,ऍड . प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, नगरसेवक प्रवीण चोरबेले, माजी नगरसेविका मनीषा चोरबेले , विश्वस्त रमेश पाटोडीया, माजी नगरसेवक शिव मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
आज दुपारी 4 वाजता सरसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजन कार्यक्रमास प्रारंभ झाला.
या तिन्ही अभिनेत्रींनींनी सर्वप्रथम मुलींचे पाय धुतले. त्यांनतर हळद कुंकू लावले. गजरा त्यांना मळून त्यांची धार्मिक व पारंपरिक पद्धतीनं पूजा केली. यांनतर महालक्ष्मी मंदिर, सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे या मुलींना शालोपयोगी साहित्य भेट दिले.