महालक्ष्मी मंदिर सारसबाग हजारो विद्यार्थ्यांचे सामूहिक श्री सूक्त व अथर्वशीर्षपठण

September 23rd, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे – आज शुक्रवारी सकाळच्या मंगलमय वातावरणात शंखाच्या आकाशात उमटणारा नाद … ढोल ताशाच्या गजरात विध्यार्थ्यांच्या मुखातून उमटत असलेल्या श्री सुक्त व अथर्वशीर्ष पठणाच्या नादस्वरात वातावरण पवित्रमय झाले होते.  आज शुक्रवारी सकाळी विविध शाळांमधील हजारो विध्यार्थ्यानी श्री सूक्त व अथर्वशीर्ष पठण सामूहिकरीत्या म्हटले.

श्री महालक्ष्मी मंदिर , सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे आज सकाळी नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची माळ विध्यार्थ्यांच्या सामूहिक पठणाने गुंफली . आज सकाळी पावसाच्या शक्यतेने हा कार्यक्रम मंदिरासमोरील रस्त्याऐवजी पुणे महापालिकेच्या गणेश कला क्रिडा रंगमंचाच्या सभागृहात घेण्यात आला.  या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते,

आज पहाटे ५. ३० वाजल्यापासून विद्यार्थ्यांचा समूह गटागटाने कार्यक्रमाच्या ठिकाणी आला होता. विध्यर्थ्यांच्या गर्दीने संपूर्ण सभागृह भरभरून गेले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वरूपवर्धिनी च्या ढोल पथकाने आपल्या ढोल-ताशांच्या दणदणाटाने सभागृह दणाणून सोडले. त्यापाठोपाठ मधुकर सिधये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शंखनादाने सभागृह एका वेगळ्या आनंदात न्हाऊन निघाले. शंखांनादाच्या ध्वनीत सादर केलेल्या प्रार्थनेस सर्वानी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

शंखनादानन्तर गणेश स्तवन , ओंकार वंदनेने भक्तमय वातावरण निर्माण केले. त्यापाठोपाठ गायत्री मंत्राचे पठण , अथर्वशीर्ष पठण , बी श्री सूक्त पठण विध्यार्थ्यानी सामुथिरीत्या सादर करून एक भक्तिमय वातावरणाचा आनन्द सर्व उपस्थितांना दिला. यानंतर गणरायाच्या आरतीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

. याप्रसंगी पुणे या कार्यक्रमास पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आनन्द करमळकर , पुण्याच्या महापौर मुक्त टिळक , प्रसिद्ध जेष्ठ अभिनेते  डॉक्टर मोहन आगाशे , प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री  भाग्यश्री संकपाळ, प्रसिद्ध गायिका मुग्धा  वेशनपायन , अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड,  महालक्ष्मी मंदिरचे मुख्य संस्थापक विश्व्स्त राजकुमार अगरवाल , मुख्य विश्वस्त अमिता अग्रवाल , विशवस्त प्रताप परदेशी,भारत अगरवाल , तृप्ती अगरवाल , प्रसिद्ध उद्योगपती कृष्णकुमार गोयल, त्यांच्या पत्नी राजमाला गोयल, बांधकाम व्यावसायिक राजेश सांकला आदी मान्यवर उपस्थित होते

याप्रसंगी बोलताना महापौर टिळक म्हणाल्या मुलांच्या, पाठांतराबरोबरच त्यांच्या निरोगीपणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू करमळकर , अभिनेते आगाशे , श्रोत्री आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक भारत अगरवाल  व प्रताप परदेशी यांनी उपस्थिठांचे आभार मानले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions