‘मामी’त पोहोचला ‘सर्वनाम’

October 2nd, 2017 Posted In: entertainment

Team TNV

मुंबईत होणाऱ्या १९ व्या ‘आंतरराष्ट्रीय मुंबई फिल्म फेस्टिव्हल’साठी सर्वनाम या मराठी सिनेमाची निवड करण्यात आली आहे. गिरीश मोहिते दिग्दर्शित या सिनेमाची ‘मामी’ फेस्टिव्हलच्या ‘इंडिया स्टोरी’ या विभागात ही निवड झाली आहे. ‘इंडिया स्टोरी’ या विभागात विविध भारतीय भाषांमधील एकूण ११ चित्रपटांची निवड झाली असून त्यात सर्वनाम या एकाच मराठी सिनेमाचा समावेश आहे. आमच्यासाठी ही अभिमानाची बाब असून प्रखर सत्यावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांना भावेल, असा विश्वास गिरीश मोहिते यांनी व्यक्त केला.

‘नाम’ एका विशिष्ट्य व्यक्तीच अस्तित्व अधोरेखित करतं मात्र सर्वनाम ही सामुहिक संज्ञा आहे. स्वतःची ओळख जपत जगताना, नियती अनेकदा असा काही अनाकलीय खेळ खेळते की तुम्हाला स्वतःचं अस्तित्व विसरून सर्वनामात विलीन झाल्याशिवाय पर्याय राहत नाही. सर्वनाम हा सिनेमा ह्या प्रखर सत्याचा अनुभव देतो. आपल्या चित्रपटामधून वेगळं काहीतरी देऊ पाहणाऱ्या दिग्दर्शक गिरीश मोहिते यांचा सर्वनाम हा सिनेमासुद्धा निश्चितंच वेगळा असेल.

अधिरोहन एंटरटेन्मेंटने या सिनेमाची प्रस्तुती केली आहे.‘प्री टू पोस्ट फिल्म्स निर्मित’ व गिरीश मोहिते दिग्दर्शित सर्वनाममध्ये मंगेश देसाई, दिप्ती धोत्रे, उमेश बोळके आणि मास्टर राजवर्धन राहुल देसाई यांच्या भूमिका आहे. याचे सहनिर्माते रोहन बनसोडे आहेत. छायांकन कृष्णा सोरेन तर संकलन निलेश गावंड यांचं आहे. कथा बशीर मुजावर यांची असून पटकथा गिरीश मोहिते व आशुतोष आपटे यांची आहे. संगीत अविनाश–विश्वजीत यांनी दिलं असून कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर यांनी केलं आहे. ‘मामी’ फेस्टिवल १२ ऑकटोबर ते १८ ऑकटोबर दरम्यान मुंबईत रंगणार आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions