मालवणी माणसाच्या अस्तित्वाचा शोध : “रॉबीनहुड” 

March 20th, 2018 Posted In: येवा कोकणात

Team TNV

विवेक ताम्हणकर, सिंधुदुर्ग 
 
 
 
आपने कभी इश्क़ किया है? जब मोहब्बत का नशा तारी होता है, तो आपके दिल की धड़कनें तेज़ हो जाती हैं. पसीना छूटता है. आप ख़ुद के भीतर एक गर्माहट महसूस करते हैं. दुनिया घूमती सी मालूम होती है. ये शरीर के वो कुछ लक्षण हैं जो आपको प्यार का एहसास होते ही नज़र आते हैं. इंसानियत के इतिहास का अच्छा-ख़ासा हिस्सा इश्क़ की नज़र हुआ है. जिधर नज़र दौड़ाइए, मोहब्बत बयां होती नज़र आती है. आर्ट हो, कल्चर हो, हर जगह कामयाब मोहब्बत और नाकाम इश्क़ के हज़ारों क़िस्से देखने-सुनने को मिल जाएंगे. दुनिया भर की लाइब्रेरीज़ में रोमांटिक उपन्यासों, प्रेमगीतों, इश्क़ के क़िस्से-कहानियों की क़िताबों की भरमार है. मोहब्बत के एहसास को मशहूर ब्रिटिश लेखक शेक्सपीयर ने अपने मशहूर प्रेमगीत, ‘सॉनेट ११६’ में कुछ यूं बयां किया है, ‘इश्क़ कभी मरता नहीं. वक़्त के दायरे इसे मिटा नहीं पाते. इंसान की हस्ती मिट जाती है, मगर प्यार क़यामत के बाद भी ज़िंदा रहता है.’
माझ्या गोष्टीतलं प्रेम जरा वेगळ तरीही शेक्सपीयरच्या प्रेमगीतातील मातीथार्थाच्या जवळ जाणार, अगदी वरील वर्णनाप्रमाणे ……. धो धो पाऊस पडत होता. अशा पावसात एके दिवशी चिंब भिजलेले दोन युवक दारात उभे राहिले. त्यापैकी एकाला तर तापच भरला होता. आपण त्यांना घरात बोलावलं. चहा बनवून दिला आणि काय कामानिमित्त आलात अस विचारल असता “आम्हाला सिनेमा बनवायचा आहे, तुमची मदत पाहिजे” असे उत्तर मिळाले. मी तर पुरती उडूनच गेले. काय बोलाव हेच मला सुचेना. तसे या युवकांना मी थोडी ओळखत होते, तरीही काय काम करता म्हणून विचारलं. यावेळी जे उत्तर मिळाल त्यावरून मनात सहज येवून गेल साध घर चालवायला पैसे पुरतील न पुरतील अशी यांची स्थिती आणि निघाले सिनेमा बनवायला. परंतु इच्छाशक्ती असेल तर सामान्य माणूसही मोठे यश मिळवू शकतो हा विचार डोक्यात आला आणि मनातले शब्द ओठावर येण्याआधीच गिळून टाकले…..अनेक चित्रपटातून मालवणी भाषिक अभिनेत्री म्हणून नाव मिळविलेल्या कणकवली कलमठ येथील अभिनेत्री “अक्षता कांबळी” सांगत होत्या. मात्र आज “रॉबीनहुड” सिनेमा लोकांसमोर आला तेव्हा त्या सिनेमाचा एक भाग असल्याचा अभिमान कांबळी यांच्या बोलण्यातून जाणवतो. 
 आता हा सिनेमा बनविण्याची इच्छा असलेल्या आणि सिनेमात झळकलेल्या तरुणांची वैयक्तिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीदेखील तेवढीच रोमहर्षक आहे. प्रशांत ठाकूर हा युवक, घराची स्थिती बेताचीच. प्रशांत एका खाजगी डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून काम करतो. आता त्याला मिळणारा मेहनताना किती असेल हे काय सांगायला नको. नितेश बुचडे हा एका मोबाईलच्या दुकानात कामाला आहे तर नितीन कांबळी आईस्क्रीमच्या डीलरकडे काम करतो. अक्षय जाधव, सिनेमाचा हिरो श्रीनाथ ढवन आणि सिनेमाची हिरोईन निकिता वळंजू हे कॉलेज विध्यार्थी. कुणाच्याही घरची सिनेमा क्षेत्राची पार्श्वभूमी नाही. केवळ अगम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्याचं स्वप्न सत्यात उतरल. “रॉबीनहुड” पडद्यावर आला. 
खर म्हणजे आजच्या तरुणाईला चौकटी मोडून त्या पलीकडे जायचं आहे. परंतु अडचण आहे योग्य मार्गदर्शकाची. येथे अक्षता कांबळी याचं योग्य मार्गदर्शन सिनेमाच्या निर्मितीचे मोठे अंग ठरले आहे हे सर्वजन कबुल करतात. प्रशांत ठाकूर आणि त्याचा मित्र नितीन कांबळी जेव्हा अक्षता कांबळी यांच्याकडे पोचले ते खाली हात मागे न फिरण्याच्या उद्देशाने. त्यांनी आपला हेतू पटवून सांगितला आणि चर्चा आली खर्चाच्या आकड्यावर. आपल्या माणसाच घोड साल इथेच अडत. अक्षता कांबळी यांच्या माध्यमातून अनेक बाबी समजून घेता आल्या. रविकिरण शिरवलकर सारखा अनुभवी संकलकही सहकार्य व काम करायला तयार झाला. चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार विजेते अभय खडपकर, जेष्ठ रंगकर्मी दीपक परब, विवेक वाळके,मालवणी कवी विलास खानोलकर, अरुण कोरगावकर, उमेश वाळके, शैलेश सावंत, यश म्हसकर  अशा अनेक लोकांनी सहकार्याची भावना दाखविली. परंतु पैसे कुठून आणायचे याच मात्र कोड सुटत नव्हत. “कोणीतरी निर्माता पहा”…. अक्षता कांबळी यांनी सूचना केली. 
“पोरांच्या डोचक्यात सिनेमाचा भूत सवार झाला हा” जवळचे काहीजण बोलत होते. मात्र हे भूत नाही तर सिनेमाशी प्रेम जडल होत. आणि ते मिळविण्याची धडपड चालली होती. त्या प्रेमात न्हावून निघायचं आणि चौकटीच्या पलीकडे उडी मारायची अशा विचाराचे तरंग उसळी घेत होते. अक्षता कांबळी यांच्या आधाराने हे प्रेम फुलणार याची खात्री मनात निर्माण झाली होती. फक्त गरज होती पैशाची. तशी प्रेमात पैशाची उधळपट्टी करावी लागते तेव्हा कुठे पोरगी हाताला लागते. हे सूत्र आहेच…… परंतु इथे पोरगीच नाही तर सिनेमाच याड लागल होत. 
यावेळी “अमित ठाकूर” मदतीला आले. ठाकूर हे जिल्हापरिषद शाळेत शिक्षक आहेत. सिनेमाची कल्पना प्रशांत आणि नितीन कांबळी यांनी स्पष्ट केली. मालवणी भाषेतील हा सिनेमा लोकांपर्यंत कसा पोचवायचा व कमीत कमी खर्चात कसा चित्रित करायचा यावर योजना ठरली. सिनेमाला लागणारी रक्कम काही उभी करण मलाही शक्य नव्हत. जिल्हा बॅंकेकडून कर्ज घ्यायचा विचार केला. थोडी हातउसनी आणि थोडी कर्जाऊ रक्कम जमा केली व सिनेमा निर्मितीला सुरवात झाली. निर्माता अमित ठाकूर सांगत होते. या तरुणांमधील जिद्द मला भावली. त्यांचा हेतू साफ होता, तोच मला भावला आणि मी मदत करायचं ठरवल अस ठाकूर म्हणाले. 
या सिनेमाच कथानक तस गावातील लोकजीवनावर बेतलेल आहे. तसेच त्यात आमच्या जगण्याचे प्रतिबिंब आहे. गावातील मंदिरात चोरी होते आणि चोराच्या शोधात अक्का गाव असताना गावातील हि पाच मुले चोर पकडण्याचा निश्चय करतात. चोर शोधायचा कसा या बाबत योजना ठरते. गावातले हेच रिकामटेकडे म्हणून ओळखले जाणारे तरुण अखेर चोराचा शोध घेतात आणि त्याला गावाच्या हवाली करतात. कालपरवापर्यंत गावातली उनाड पोर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ती मुल गावाची हिरो होतात. असे कथा लेखक आणि दिग्दर्शक नितीन चंद्रकांत कांबळी यांनी बोलताना सांगितले. हा सिनेमा करताना मुलाला जन्म देण्यासाठी आईला काय कराव लागत याची अनुभूती आम्हाला आली. त्यामुळे आम्ही आजही सिनेमाच्या बाबतीत गंभीर आहोत. केवळ हौस म्हणून नाही तर खूप काही शिकण्याच हे मध्यम आहे याची अनुभूती आली असल्याचेही कांबळी म्हणाले. 
रविकिरण शिरवलकर यांनी या सिनेमाच्या चित्रीकरणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. शिरवलकर हे एक उत्तम आर्टिस आहेत. फार कमी वयात त्यांनी केलेले अनेक प्रकल्प लोकप्रिय झाले आहेत. यापूर्वी त्यांनी पहिल्या भिकू नावाच्या मालवणी सिनेमाच्या निर्मितीत मोठे योगदान दिले आहे. त्याचाही अनुभव त्यांच्या गाठीशी होता. ते म्हणतात मुळात हा सिनेमा कमीतकमी खर्चात करायचा होता म्हणून मोजक्या वेळेत चित्रीकरण आटपायचे होते. हेच मोठे आव्हान आमच्यासमोर होते. परंतु आमच्या सर्वच लोकांनी मनापासून मेहनत घेतली आणि स्वप्न सत्यात उतरले. कणकवली जवळच्या गावातच चित्रीकरण केळे. विशेष म्हणजे बरेच चित्रण हे ड्रोन कॅमेरा वापरून केळे आहे. चित्रीकरण, डबिंग आणि बाकी सर्व बाबी आम्ही अवघ्या १७ दिवसात पूर्ण केल्या. संपूर्ण सिनेमा तयार झाला. शिरवलकर यांनी सांगितलेली सिनेमाची हि प्रक्रिया अत्यंत प्रेरनादाई आहे. 
अभिनेता प्रशांत ठाकूर म्हणतो आम्ही अनेक ठिकाणी ऑडिशन्स देण्यासाठी जात असू मात्र त्या ठिकाणी नव्या लोकांना बाजूला बसवले जात असे. आणि अनुभवी लोकांना संधी मिळत असे. आम्ही कंटाळून मागे येत असू. मागे येन हा आमचा दिनक्रमच झाला होता. एकेदिवशी स्वताच सिनेमा बनवायचा आणि स्वतःतील कला दाखवून द्यायची हा विचार मनात आला. आणि ठरलं. अनेक अडचणी आल्या मात्र सिनेमा पूर्ण झाला याचे खूपच समाधान आहे. या सिनेमात आमच्या जिवनातील ऑडिशन्सची सत्य कथाही चित्रित केलेली आहे. थोडा वास्तवतेकडून समाजातील समस्यांना स्पर्श करणारा असा हा सिनेमा आहे. 
अशा नव प्रयोगात नेहमीच साथ असते ती अभिनेते अभय खडपकर यांची. मालवणी मुलखातील मुले आता वेगवेगळी क्षेत्र हाताळू पाहतात हि मोठी जमेची बाजू आहे. त्यात येथील मालवणी भाषा आता सिनेमा, मालिका अशा माध्यमात प्रामुख्याने अंतर्भूत केली जातेय. लोकांनाही मालवणी भाषेतील कलाकृती आवडायला लागल्यात. ‘रात्रीस खेळ चाले’, ‘गाव गाता गजाली’ अशा मालवणी भाषेतल्या मालिका लोकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. यामुळे भाषेचे संवर्धन होतेच शिवाय टी भाषा जगाच्या कोपऱ्यातही पोचायला मदत होते. कणकवलीतील तरुणांचा हा प्रयोग मी त्याच दृष्टीने पाहतो किंबहुना अशा मुलांना प्रोत्साहन देण्याच्या भावनेतून मी नेहमीच प्रयत्नशील असतो. असे मत यावेळी अभय खडपकर यांनी मांडले. 
 
मालवणी रसिकांची “हाऊसफुल्ल” दाद 
 
मालवण बोली भाषेतील पहिला भिकू हा चित्रपट डिसेंबर २०१५ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर रॉबिनहुड हा सव्वा तासाचा चित्रपट रसिकांच्या भेटीला आला. कोकणचे सौंदर्य आता सातासमुद्रा पलीकडे पोहोचले आहे. मालवणी भाषेला मच्छिंद्र कांबळी यांनी दर्यापार नेले. अनेक मालवणी मालिका दुरचित्रवाणीवर आज गाजत आहेत. भिकू चित्रपटातील काही अनुभवी आणि कणकवली परिसरातील उदयोन्मुख कलाकारांनी ‘रॉबीनहुड’ हा चित्रपट बनविला आहे. १७ दिवसांत साकारलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण कणकवलीच्याच परिसरात झाले आहे. रसिकांनी हा चित्रपट जरूर पाहावा असा असून स्थानिक कलाकारांना पाठबळ देण्यासाठी तर तो पहिलाच पाहिजे. चित्रपटात निकीता वळंजू हिचे दमदार पदार्पण पहायला मिळते. प्रेमात पडलेली महाविद्यालयीन तरुणी तिने अत्यंत सहजपणे साकारली आहे. तिच्यावर चित्रित झालेलं गीत सिनेमाला वेगळीच कलाटणी देणार आहे. निकिता हि सामान्य कुटुंबातली. अभय खडपकर यांनी दिलेला विश्वास तिने सार्थ ठरवला म्हणायला हरकत नाही. या सिनेमाच्या निमित्ताने आपल्यात दडलेली एक सुप्त अभिनेत्री निकिताला गवसली नसेल तर नवलच. 
रॉबिनहुडचे संपूर्ण चित्रीकरण हे पाच दिवसाचे आहे. बाकी सर मिळून हा चित्रपट  १७ दिवसात पूर्ण झाला आहे. कणकवली जवळच्या आशिये गावातील गांगोभैरी, दत्त मंदिर, वरवडे संगम, तरंदळे धरण, कळसुलीतील मधुकर हॉटेल आणि वाळकेश्व्र मंगल कार्यालय तसेच करंजे येथील पालखेश्व्र मंदिर अशी स्थळे चित्रपटात पहायला मिळतात. या कलाकारांना प्रोत्साहन म्हणून राकेश काणेकर, संतोष काकडे, शाम सामंत, कौस्तुभ राणे आणि अजित आजगांवकर यांचे सहकार्य लाभले आहे. हा चित्रपट १७ फेब्रुवारीला रात्री ९ वाजता कणकवलीतील मराठा नाट्यगृहात प्रथमच प्रदर्शित झाला आणि मालवणी रसिकांनी तो डोक्यावरही. कलाकारांनी हाऊसफुल्लचा बोर्ड झळकवत मालवणी माणसाने दिलेली दादा सेलीब्रेट केली. 

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions