पुणे : पुण्यातील ‘यीन -यांग सेंटर फॉर चायनीज लँग्वेज’ संस्थेच्या मालविका चव्हाण आणि ईप्सिता केळकर या दोन विद्यार्थिनींना चीन सरकारची शिष्यवृत्ती मिळाली असून, त्यांना चीन भेटीची संधी मिळाली आहे.
‘यिन -यांग सेंटर फॉर चायनीज लँग्वेज’ च्या संचालक यशोधरा गाडगीळ यांनी ही माहिती दिली.
मालविका चव्हाण ही कर्नाटका हायस्कूलमध्ये इयत्ता 11 वी मध्ये (वाणिज्य शाखा) शिकत आहे. ईप्सिता केळकर ही ‘सूर्यदत्ता आर्टस् कॉलेज’ मध्ये इयत्ता 12 वी मध्ये शिकत आहे. दोघीही गेली 18 वर्षे यिन -यांग सेंटर मध्ये चीनी भाषेचे शिक्षण घेत आहेत.
चीन सरकारच्या शिक्षण विभागातर्फे ही शिष्यवृत्ती देण्यात येते. चीन भेटीदरम्यान या दोन विद्यार्थिनी दोन आठवडे चीन संस्कृती, भाषा, मार्शल आर्ट, पेंटींग, कॅलिग्राफी शिकतील. भारतातून एकूण पाच विद्यार्थी निवडण्यात आले असून, 3 कोलकात्यातील आहेत.