गोमू माहेरला जाते हो नाखवा..
तिच्या घोवाला कोकण दाखवा..
दावा कोकणची निळी निळी खाडी ..
दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी ..
भगवा अबोली फुलांचा ताटवा..
कोकणची माणसं साधी भोळी..
काळजात त्यांच्या भरली शहाळी..
खरंच या गाण्यातली प्रत्येक ओळ आणि ओळ अगदी खरी आहे… कोकण आहेच तसं.. मराठी कवींना तर या कोकणाने भुरळच घातली आहे.. ‘गोमू माहेरला जाते हो..’ असो किंवा ‘माझ्या गोव्याच्या भूमीत असो..’ या सगळ्या गाण्यांमध्ये किंवा कवितांमध्ये कोकणचं, इथल्या मातीचं, इथल्या अतिशय प्रेमळ माणसांचं, निसर्गाचं इत्यादी इत्यादी सगळ्या गोष्टींच वर्णन आणि भरभरून कौतुक दिसतं.. आणि त्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही.. कोकण आणि इथली माणसं जशी आहेत अगदी तशीच्या तशी त्यात उतरवली आहेत…
आता हे कोकण कोकण म्हणजे नेमकं काय? तर आपल्या स्कंदपुराणापासून या कोकणाचा आपल्याला उल्लेख दिसेल.. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडानुसार परशुरामाने समुद्रात बाण मारला आणि जिथे त्याचा बाण आहे तिथे समुद्र देवाला जाण्याचा आदेश केला.. आणि त्या बाणामुळे समुद्राजवळ हा जो नवीन तुकडा वसला त्याला ‘सप्त कोकणा’ म्हणून ओळखले जाऊ लागले.. कोकण याचाच अर्थ ‘पृथ्वीचा तुकडा’ किंवा ‘पृथ्वीचा कोपरा’ किंवा ‘कोपऱ्याचा तुकडा’ असा होतो. हा शब्द संस्कृत शब्दापासून बनला आहे. Kona म्हणजे कोण, कोपरा, कॉर्नर आणि Kana म्हणजे कण, तुकडा, piece..
या विषयावर बोलायचं ठरवलं तर वेळ कमी पडेल.. म्हणून आता इथेच थांबुयात..
तर असं कोकण.. जे प्रत्येकालाच भुरळ पाडतं.. मग “The Neutral View” तरी त्यातून कसं वाचेल? म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय कोकण कॉर्नर.. “येवा कोकणात” ..
– विनया वालावलकर