कणकवली येथे येवा कोकणात पाक्षिकाच्या कोकण कार्यालयाचे आमदार राणे यांच्या हस्ते उद्घाटन
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भविष्याची दिशा बदलण्यात आम्हाला मदत करेल असा द न्यूट्रल व्ह्यु चा “येवा कोकणात” हा मराठी अंक आमच्या जिल्ह्याचे महत्व महाराष्ट्र राज्यात वाढवेल असा विश्वास महाराष्ट्र विधानसभेतील युवा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. कणकवली येथे येवा कोकणात पाक्षिकाच्या कोकण कार्यालयाचे उद्घाटन व अंकाचे प्रकाशन आमदार राणे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, गणेश तांबे, द न्युट्रल व्ह्यु प्रायवेट लिमिटेडचे संचालक उत्तम कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी रुपेश सामंत, अभिनेते अभय खडपकर, युवा नेते संदीप मेस्त्री, राकेश रावराणे, शामसुंदर दळवी, कृषी विभागाचे अधिकारी शिवराज खरात, येवा कोकणात चे निवासी संपादक विवेक ताम्हणकर, जाहिरात व्यवस्थापक समील जळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार नितेश राणे पुढे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकारितेत “येवा कोकणात” हे पाक्षिक दाखल होत आहे. आपल्या जिल्ह्याचे भविष्य ठरवताना दिशा बदलण्यात आम्हाला मदत करेल आणि आमच्या कामात सहभागी होईल. तसेच आमच्या जिल्ह्याचे महत्व संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्र राज्यात वाढविण्यात आम्हाला हातभार लावेल याची आपल्याला खात्री आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “येवा कोकणात” च्या टीमचे कौतुक करताना वृत्तपत्र आणि राजकारण हि दोन्ही क्षेत्र एक दुसऱ्याला संलग्न आहेत तेव्हा तुमच आमचं प्रेम वृद्धिंगत होवो असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी संचालक आणि कर्मचारी या सर्वाना आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या.
द न्युट्रल व्ह्यु प्रायवेट लिमिटेडचे संचालक उत्तम कुमार यांनी सर्वांचे आभार मानताना बदलत्या कोकणचे शिलेदार असलेले युवा आमदार नितेश राणे यांचे कौतुक केले. आमदार नितेश राणे यांच्या कार्यात आमचा नेहमीच खारीचा वाट असेल असा विश्वास देताना चला पुन्हा एकदा आपल्या बाहेर गेलेल्या कोकणी माणसाला त्याच्या घरी बोलवुया असे आव्हान केले. तसेच राजकारण्यांवर केवळ टीका न करता एका दिवस आपण राजकारणी म्हणून जगून पहावे म्हणजे त्यांच्या नेहमीच्या हसऱ्या चेहऱ्यामागचे रहस्य कळेल. आम्ही पाक्षिक चालवत असताना आम्हाला काहीतरी भडक चर्चा निर्माण नाहीय तर वाचकांना वैचारिक खाद्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. चांगली गोष्ट लोकांसमोर ठेवण्याचा आमचा मानस आहे असे ते म्हणाले.
यावेळी दिवसभरात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सायली सावंत. सामाजिक कार्यकर्ते समीर सावंत, वागदे सरपंच संदीप सावंत, रत्नागिरी टाइम्सचे आवृत्ती प्रमुख लक्ष्मीकांत भावे, पुण्यनगरीचे आवृत्ती प्रमुख भगवान लोके, स्टेटस कंम्प्युटरचे संचालक दिनेश कदम आदी मान्यवरांनी कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.