पुणे – रेकी तज्ज्ञ संगीता राजेश शेट्ये यांना रेकी हीलिंग आणि प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल अलीकडेच ‘वॉव अवॉर्ड ‘ देऊन गौरविण्यात आले .
ब्लिस पब्लिकेशन्स ने मुंबईत आयोजित समारंभात अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . रेकी हीलिंग आणि प्रशिक्षण क्षेत्रात त्या २ दशके कार्यरत आहेत. ‘तणावमुक्तीसाठी सकारात्मकता वाढवा ‘,’रिलेटिंग इमोशन्स एन्ड डिसीज ‘ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत . या विषयावर त्यांनी व्याख्याने देऊन जनजागृती केली आहे,आणि विपुल लेखन केले आहे
यावेळी पारुल बिन्दाल ,संदीप सोपारकर ,आशय वाघोलीकर ,राल्फ भास्करन ,रिदम वाघोलीकर उपस्थित होते