पुणे – ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’, ‘पुणे महानगरपालिका’, ‘सस्टेनॅबिलीटी इनिशिएटीव्ह’, ‘सस्टेनेबल लिव्हींग इनटीग्रीएटेड सोल्यूशन्स’, ‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ’ आणि ‘गंगोत्री ग्रीन बिल्ड’ संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रीन सोसायटी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या गृहसंस्था, पुणेकर नागरिक पाणी कचरा व ऊर्जा यांचे उल्लेखनीय व्यवस्थापन करतील त्यांचा पारितोषिके देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’ चे अध्यक्ष गणेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पत्रकार परिषदेला गणेश जाधव, विश्वास लेले, गिरीश मठकर, अनघा पुरोहित, निरंजन उपासनी, मनीषा कोष्टी व मकरंद केळकर हे उपस्थित होते.
स्पर्धेचे उदघाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दिनांक 5 नोव्हेंबर 2017 रोजी गांधीभवन कमिन्स कंपनीच्या मागे, कोथरूड, पुणे-38 येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. स्पर्धेनंतर निरंजन उपासनी, सुचिस्मिता पै व अमर चक्रदेव या तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
‘गंगोत्री ग्रीन बिल्ड’ संस्था स्पर्धेची प्रायोजक आहे
गिरीश मठकर (प्रकल्प संचालक, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन), गणेश जाधव (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन) आणि विश्वास लेले (समन्वयक, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन) हे स्पर्धेचे निमंत्रक आहेत.
स्पर्धेसाठी 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत नावनोंदणी आवश्यक असून, रेखा लेले 9420483394 आणि विश्वास लेले – 9422319710 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी पुण्यातील गृहसंस्था व पुणेकर यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’च्या वतीने गणेश जाधव यांनी केले.
स्पर्धेच्या तयारीसाठी लागणारा कालावधी दिनांक 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत असून, प्रकल्प तपासणी 10 ते 20 फेब्रुवारी 2018 रोजी होईल आणि पारितोषिक वितरण समारंभ 23 फेब्रुवारी 2018 रोजी होणार आहे.