केअर इंडिया मेडिकल सोसायटी’च्या ‘विश्रांती कॅन्सर पॅलिएटिव्ह केअर सेंटर आणि ‘मातृसेवा डायग्नोस्टिक सेंटर’ मधील गरजू कॅन्सर रुग्णांसाठी मोफत सेवा देते. यामध्ये रुग्णास प्रवेश देणे, मोफत तपासणी, २४ तास नर्सिंग आणि सहायक काळजी घेणे, आहार, रुग्णाचा मुक्काम, मार्गदर्शन आणि सल्ला या सुविधा मोफत पुरविल्या जातात
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन कडून वैद्यकीय उपकरणे भेट
Team TNV November 22nd, 2017 Posted In: Pune Express
Team TNVपुणे – कर्करोगावर मोफत उपचार करणाऱ्या ‘कॅन्सर केअर सेंटर’ला ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’ कडून वैद्यकीय उपकरणे भेट देण्यात आली. केअर इंडिया मेडिकल सोसायटी’च्या ‘विश्रांती कॅन्सर पॅलिएटिव्ह केअर सेंटर आणि ‘मातृसेवा डायग्नोस्टिक सेंटर’ मधील गरजू कॅन्सर रुग्णांसाठी पेशंट ट्रॉली, लिम्फडेमा पंप, एक्झामिनेशन कोच (तपासणी पलंग) या उपकरणांची भेट देण्यात आली.
शनिवारी भवानी पेठ मधील ‘विश्रांती कॅन्सर केअर सेंटर’ मध्ये ही उपकरणे रोटरी चे सहाय्यक प्रांतपाल चंद्रशेखर यार्दी, ‘रोटरी क्लब पुणे गांधीभवन’चे अध्यक्ष गणेश जाधव यांच्या हस्ते सेंटर चे संस्थापक विश्वस्त कर्नल (निवृत्त) एन.एस. न्यायपती, डॉ. अशोक सुमंत यांना सुपूर्त करण्यात आली. कर्करोग रुग्णांना मोफत सेवा देणाऱ्या संस्थेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे
यावेळी रोटरीचे प्रकल्प संचालक गिरीश मठकर, प्रकाश भट, शैलेश गांधी उपस्थित होते. देणगीदार शेखर रेगे (अभीर फाऊंडेशनचे विश्वस्त)यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या प्रकल्पास प्रकाश भट आणि अभीर फाऊंडेशनचे ट्रस्ट चे शेखर रेगे यांचे सहकार्य लाभले.