पुणे – पुणे शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘लोक माझे सांगाती’ पुस्तक शाळा व महाविद्यालयांला भेट देण्यात आले, अशी माहिती पुणे शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष मनाली भिलारे यांनी दिली.
अप्पासाहेब जेधे काॅलेज (शुक्रवार पेठ ), चिंतामणी प्राईड (आंबेगाव पठार), चिंतामणी विद्यामंदीर (आंबेगाव पठार), प्रियदर्शनी विद्यामंदिर (धनकवडी ), प्रियदर्शनी इंग्रजी विद्यालय (धनकवडी ), कै. चंद्रकांत दांगट महाविद्यालय (वडगाव बु. ), शाहू काॅलेज(पर्वती पायथा ), जिजामाता हायस्कूल (शुक्रवार पेठ ) या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुस्तके वाटप करण्यात आले.
या वेळी पुणे शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्ष मनाली भिलारे, युवती पदाधिकारी अक्षता राजगुरू, सोनाली गाडे, गीतांजली सारघे, मेघा पंडित, कृतिका चिवटे, अबोली घुले, पौर्णिमा आढाक या युवती उपक्रमात सक्रिय सहभागी झाल्या होत्या.
शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा सांगणारे हे ४०० पानी पुस्तक असून, शरद पवारांनी आपला राजकीय प्रवास पुस्तकाद्वारे उलगडला आहे. त्यांचे कार्यकर्ते, देशीविदेशी स्नेही, मोठ्या व्यक्तींबाबतची त्यांची मते, भावना या पुस्तकातून त्यांनी व्यक्त केल्या आहेत. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शरद पवार यांच्या बारामती ते मुंबई व मुंबई ते दिल्ली असा दीर्घ राजकीय प्रवासकार्याची माहिती व्हावी या उद्देशाने आणि शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे पुस्तक वाटप करण्यात आले, असे मनाली भिलारे यांनी सांगितले
यावेळी प्राचार्य पोळ (अप्पासाहेब जेधे काॅलेज), शर्मिली पांडे (चिंतामणी प्राईड ), मुख्यध्यापिका सायली गोवेकर( चिंतामणी विद्यामंदीर ), मुख्यध्यापिका मांडवकर (प्रियदर्शनी इंग्रजी विद्यालय), उपमुख्यध्यापिका नंदा शिरवळकर (प्रियदर्शनी इंग्रजी विद्यालय), मुख्याधापक पाटील (कै. चंद्रकांत दांगट महाविद्यालय), प्राचार्य शोभा इंगवले (शाहू काॅलेज), प्राचार्य सुमन सातव (जिजामाता हायस्कूल) उप