शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. निलमताई गो-हे यांनी आज गोव्यातील प्रसिध्द देवस्थान व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री मंगेशी, महालक्ष्मी आणि शांतादुर्गा, म्हाळसा यांचे पवित्र दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्या भगिनी श्रीमती झेलम जोशी, गोव्याचे उत्तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर राव त्यांच्यासोबत होते.
मंगेशी मंदिराचे व्यवस्थापक अनिल केंकरे यांनी स्वागत केले तर महेश करंडे यांनी माहिती दिली.
शांतादुर्गा मंदिरात गेली अनेक वर्षे ताईंना पुजासाहित्य देणाऱ्या शीला नाईक यांनी आवर्जून भेट घेतली.
उपस्थित नागरिक व देशातील सर्व घटकांना सुख, समृद्धी व समाधान लाभावे अशी प्रार्थना त्यांनी या वेळी श्रींकडे केली.