शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करणे आणि त्यांना रास्त भाव मिळणे हे आपले उद्दिष्ट – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.

December 4th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे – शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीने पिकवलेल्या भाजीपाला,फळे फुले धान्य व इतर मालासाठी योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी संपूर्ण शहरात प्रत्येक वार्डात असे शेतकरी आठवडे बाजार सुरु केले जावेत अशी सूचना कृषीभूषण बुधाजीराव मुळीक यांनी केली.तसेच या बाजारात मालाचे वर्णन असणारे पत्रक ही ग्राहकांना दिले जावे असेही ते म्हणाले.हा माल पिकविताना किती कष्ट घ्यावे लागतात याची माहिती व्हावी आणि या पालेभाज्या/कडधान्ये किंवा फळान्मध्ये आपल्या शरीराला उपयोगी पडणाऱ्या किती गोष्टीचा,जीवनसत्त्वांचा भरणा आहे याची माहिती या पत्रकात असावी,अशी पत्रके परदेशात दिली जातात व त्यातून नागरिक अश्या बाजारांकडे आकृष्ट होतात.परदेशात असे आठवडे बाजार हे प्रशासनच भरवते व त्या ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रम ही ठेवले जातात व त्यास नागरिक प्रचंड गर्दी करतात,असे उपक्रम आपण आपल्या भागातही सुरु करावेत असे सुचवितानाच यासाठी मंजुश्री खर्डेकर यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व काही शेतकरी आठवडे बाजारांची उलाढाल शंभर कोटींच्या घरात गेली आहे तसेच आपल्या बाजारास ही यश मिळावे अश्या शुभेच्छा ही त्यांनी दिल्या.
 
 
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि मयुर पवार यांच्या विंग्रो फार्मर प्रोडयुसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या प्रभाग क्रमांक १३ मधील सहवास सोसायटी भागात आयोजित केलेल्या शेतकरी आठवडे बाजाराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,नगरसेवक दीपक पोटे,बाजारासाठी जागा उपलब्ध करुन देणारे शिरीष भुजबळ,कोथरूड मंडल विस्तारक पुनीत जोशी,कोथरूड मंडल सरचिटणीस बापूसाहेब मेंगडे,शहर कार्यकारिणी सदस्य प्रशांत हरसुले,प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे,शुभांगीताई सुदामे,अनुराधाताई एडके,प्रवीण जोशी,जगदीश डिंगरे,शरद लेले,अक्षय सुदामे,संगीताताई आदवडे,प्रमिलाताई फाले,माणिकताई दीक्षीत,शिवराज शिंदे ,छायाताई सोनावणे,श्री राळेरासकर,व या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
सप्टेंबर महिन्यात पटवर्धन बाग येथे सुरु केलेल्या आठवडे बाजारास प्रचंड प्रतिसाद मिळाला व हा बाजार यशस्वी झाल्यानंतर आता प्रभागात दुसरा आठवडे बाजार सुरु करताना मनस्वी आनंद होत असून शेतकरी बांधवांना त्यांच्या मालास थेट ग्राहकांना विकता येत असल्याने रास्त दर मिळत आहे याचे समाधान लाभत आहे असे या बाजाराच्या संयोजिका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.या बाजारात ग्राहक आणि शेतकऱ्यांमधे एक नाते निर्माण व्हावे असा आपला प्रयत्न असून अश्या बाजारातून जसे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला थेट ग्राहक आणि रास्त दर मिळतो तसेच ग्राहकांना ही छान ताजा आणि दर्जेदार माल मिळतो हे लक्षात आल्यावर बाजाराला उत्तम प्रतिसाद लाभतो आणि शेतकरी आणि ग्राहकात सुसंवादाचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होते असेही त्या म्हणाल्या.पुढील काळात प्रभागात अन्यत्र आणि कोथरूड च्या विविध भागातही असे बाजार सुरु करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
 
हा बाजार दर शनिवारी सहवास सोसायटी समोरील भुजबळ यांच्या जागेत पेरुच्या बागेजवळ भरणार असून त्यात विविध शेतमाल रास्त दरात उपलब्ध होणार आहे. या वेळी नगरसेवक दीपक पोटे व नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी ही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी,प्रास्ताविक मंजुश्री खर्डेकर यांनी तर आभार प्रदर्शन मयुर पवार यांनी केले.उपस्थितांचे सत्कार शुभांगी सुदामे,बाळासाहेब धनवे,अनुराधाताई एडके व संगीता आदवडे यांनी केले.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions