पुणे – श्री दावडी निमगांव मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थानतर्फे चंपाषष्ठी उत्सवांतर्गत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कसबा पेठ, शिंपी आळीतील पेशवेकालीन खंडोबा मंदिराचा परिसर शेकडो दिव्यांनी उजळून निघाला. यावेळी नागरिकांनी दीपोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
दीपोत्सवाची सुरुवात राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालेल्या गौरी गाडगीळच्या हस्ते झाले. यावेळी उत्सवप्रमुख संदीप लचके, गायत्री लचके,रुचिरा लचके, संजय नेवासकर,भाऊ आदमणे, पीयुष शहा, शाहीर हेमंत मावळे, अजय खोडे,वसंत खुर्द उपस्थित होते.
उत्सवप्रमुख संदीप लचके म्हणाले, चंपाषष्ठी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अभिषेक व महापूजा होणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.