पुणे : पुणे महानगर पालिकेतील भाजपा सत्तेला आज सहा महिने पूर्ण झाले आहेत. या सहा महिन्याच्या काळात भाजप ने जाहीरनाम्यात दिलेल्या कोणत्याही कामांची पूर्तता केलेली नाही, या विषयीचा जाब विचारण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘जाबनामा’ आंदोलनाचे आयोजन केले होते. हे आंदोलन शुक्रवारी पुणे महानगर पालिका भवन समोर करण्यात आले.
या आंदोलनात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, सुभाष जगताप, अशोक राठी, नंदा लोणकर, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, रुपाली चाकणकर, रेखा टिंगरे, लक्ष्मी दुधाने, शिल्पा भोसले, इकबाल शेख, मिलिंद वालवाडकर, काका चव्हाण, विपुल म्हैसूरकर, सिद्धार्थ जाधव, वनराज आंदेकर, प्रकाश कदम, शांतीलाल मिसळ, युवराज बेलदरे, युसूफ शेख, विक्रम मोरे, भय्यासाहेब जाधव, योगेश ससाणे, नगरसेवक, सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘सहा महिन्याच्या काळात भाजप ने जाहीरनाम्यात दिलेल्या कोणत्याही कामांची पूर्तता केलेली नाही, मागील १० वर्षांच्या कालखंडात महानगर पालिकेत घेण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय स्पर्धामध्ये पुणे शहराने कायम प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. परंतु गेल्या सहा महिन्यामध्ये पुणे शहराची अधोगती झाली आहे. पालिकेचे नवीन पदाधिकारी, नगरसेवक, दिशाहीन आहेत, त्यांना योग्य दिशा देणारे नेतृत्व नाही. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार यांनी आमच्या पक्षाला योग्य नेतृत्व दिले, म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकलो. एक पुणेकर म्हणून या सहा महिन्यातील पुण्याची अधोगती झालेली पाहून वाईट वाटते. शहरात विविध राज्यातून, देशातून नागरिक येत असतात त्यामुळे पुणे शहर हे एक नंबरचे शहर म्हणून बनले पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु कर्ज रोखे घेतले जात आहेत, स्मार्ट सिटीमध्ये पारदर्शकता नाही, कोणत्याही नवीन योजना नाहीत, कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा नाही या पद्धतीने कामकाज चालू राहिले तर पुणे शहर मागासलेले शहर म्हणून पाहायला मिळेल.
चेतन तुपे म्हणाले, पुणे हे देशातील वेगाने वाढणारे शहर होते. पालिकेच्या सहा महिन्याच्या कामकाजात बीआरटीची एकही नवीन सेवा चालू केली नाही, बस सवलती बंद केल्या, शिक्षण मंडळ बरखास्त केलं, परंतु अद्यापही नवीन शिक्षण मंडळ नेमले नाही. पुणेकर जाणकर आहेत, तेच योग्य ठरवतील. देशामध्ये सर्वांत जास्त शिक्षण घेणारे विद्यार्थी पुणे शहरामध्ये आहे. परंतु विद्यार्थ्यांना योग्य सोयी सुविधा नाहीत. पुणे शहर देशामध्ये एक नंबर होते ते भाजपाच्या सत्तेत अधोगतीला जात आहे.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘निवडणुकीपूर्वी भाजपा ने जी आश्वासने दिली होती त्यामुळे सामान्य महिलांना दिलासा मिळाला होता. परंतु केंद्रात, राज्यात, पुणे महानगरपालिकेत महिलांची दिशाभूल झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रात पुण्यातील महिला पुढे येण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने कोणताही पुढाकार दाखविला नाही. सामान्य पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यात भाजपाला यश आले नाही, हे सहा महिन्याच्या कामकाजातून दिसून येते. भाजपा ने पुणेकरांची फसवणूक थांबविली पाहिजे