साईबाबांची 30 फूट उंच 18 फुट रूंद पुष्प रांगोळी चित्र ठरले लक्षवेधक

November 6th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे – शिवतीर्थ नगर, पौडरोड येथील श्री गणेश मंदिरामध्ये शुक्रवारी सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. गेली 17 वर्षे या उपक्रमाचे मंदीरात आयोजन केले जाते. त्रिपूरारी पोर्णिमेनिमित्त श्रीकांत गोरे (वय 77) यांनी काढलेल्या साई बाबांच्या 30 फूट उंच 18 फुट रूंद पुष्प रांगोळी चित्राभोवती पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. रसिका सुतार यांनी त्रिपूर वात लावून उपक्रमाचे उद्घाटन केले.
 
या उपक्रमास शशिकांत सुतार, उत्सव प्रमुख पृथ्वीराज सुतार यांचे सहकार्य लाभले. यावेळी व्यवस्थापक आनंदा अंबरडेकर, मधुकर शिंदे, आनंद फडके, ओमकार गेहुले, ममता गेहुले, प्रीती गेहुले, कश्मीरा लाड सहभागी झाले होते. 
 
संस्थापक माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी 27 वर्षांपुर्वी खासदार निधीतून बांधलेल्या या श्री गणेश मंदिरामध्ये अनेक धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. पेशाने इंजिनिअर असलेले श्रीकांत गोरे (वय 77) समाजकार्याची आवड म्हणून पौड रोड येथे गेली 30 वर्षे विद्यार्थ्यांना चित्रकलेचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. 
 
दरवर्षी श्रीकांत गोरे संत, देव देवता यांची चित्रे काढतात. यंदाच्या वर्षी त्यांनी श्री साई बाबा यांची पुष्प रांगोळी काढली. ही रांगोळी अतिशय लक्षवेधक होती. महिला, नागरिक मोठ्या संख्येने या दीपोत्सवात सहभागी झाले होते. 

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions