पुणे – सॅमसंग इंडियाने आज वॉशर व ड्रायरची सोय असलेली फ्लेक्सवॉश यंत्रणा लाँच केली. उच्च दर्जाची कामगिरी करणाऱ्या या उपकरणामध्ये दोन वॉशर्स आणि एक ड्रायरचा समावेश करण्यात आला आहे. या उपकरणात अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपयुक्तता व कलात्मक रचना यांचा मेळ घालण्यात आला आहे.
सॅमसंगच्या मूलभूत लाँड्री तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या फ्लेक्सवॉश उपकरणात लोकप्रिय अॅडडोअर वापरण्यात आले आहे, ज्यामुळे ग्राहकाला लाँड्रीसाठी ते वापरताना पूर्ण स्वातंत्र्य आणि लवचिकता मिळतेच, शिवाय कपडे दीर्घकाळ टिकावे म्हणून त्यांची आवश्यक काळजीही घेतली जाते.
सतत व्यग्र असलेल्या लोकांना कमीत कमी वेळेत कपडे धुता यावेत यासाठी तयार करण्यात आलेल्या या वॉशिंग मशिनमध्ये 23 किलोपर्यंतचे वजन स्वीकारण्याची क्षमता आहे. हे बहुपयोगी मशिन सॅमसंगच्या तीन मूलभूत तंत्रज्ञानांचा वापर करते. त्यात इकोबबल, बबल सोक आणि व्हायब्रेशन रिडक्शन टेक्नॉलॉजी (व्हीआरटी प्लस) यांचा समावेश आहे. इकोबबल पाणी व हवेचा वापर करून वॉशिंग पावडर विरघळवते आणि स्वच्छतेचे काम अधिक जलद व परिणामकारक होण्यासाठी बबल अॅक्शन तयार करते.
युनिट्स आयओटीवर आधारित आणि स्मार्ट कंट्रोलचा समावेश असलेले आहेत, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनद्वारे मशिनवर कुठूनही आणि कोणत्याही वेळेस लक्ष ठेवता येते. मशिन कोणत्याही वेळेस सुरू किंवा बंद करण्याचं नियंत्रण अक्षरशः त्यांच्या तळहातात असतं. कलात्मक रचना आणि सोयीस्कर डिझाइनमुळे भारतीय ग्राहकाच्या वेळेची आणखी बचत होते. आयओटीवर आधारित उपकरणे भविष्यात जास्त प्रचलित होणार असून या तंत्रज्ञानाचे प्रवर्तक असलेली सॅमसंग आपल्या सर्व उत्पादन श्रेणींमध्ये त्याचा वापर करण्याच्या तयारीत आहे.
‘ग्राहकाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सॅमसंगने कायमच नाविन्यपूर्णतेत आघाडी राखत नवनवीन उत्पादने तयार केली आहेत. फ्लेक्सीवॉशच्या लाँचसह कपडे धुण्याचे काम जास्त सोपे आणि सोयीस्कर करण्याचे आमचे ध्येय आहे. आमच्या नाविन्यपूर्णतेतील प्रत्येक वैशिष्ट्य हे ग्राहकाला डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आले आहे,’ असे अलोक पाठक, उपाध्यक्ष, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग इंडिया यांनी सांगितले. ‘ग्राहकाच्या मानसिकतेत मोठा बदल पाहायला मिळत असून ड्युएलवॉलश आणि अडवॉशसारख्या तंत्रज्ञानांना त्यांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या क्षेत्रातील आघाडीचे स्थान मजबूत करण्यास आम्हाला मदत होत आहे,’ असेही ते म्हणाले.
फ्लेक्सवॉश 15 ऑगस्ट 2017 पासून सॅमसंगच्या सर्व दालनांत आणि प्रमुख रिटेलर्सकडे 1,45,000 रुपयांत उपलब्ध होणार आहे.