पुणे – पुण्यात एबीसी क्लिनिकच्या १७व्या शाखेचे अभिनेत्री मंजिरी फडणीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी सौंदर्य जपणे ही काळाची गरज असून त्याने आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते असे मत मांडले
पुढे त्या म्हणाल्या कि, फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना आणि सगळ्यांनाच आपल्या दिसण्याचे महत्व वाटत असून त्यासाठी हवे ते करण्याची त्यांची तयारी असते. सोशल मिडिया आणि फॅशन मासिकात दररोज ग्लॅमरस, नितळ त्वचा, सुरेख केस आणि शीडशिडीत बांधा असलेले मॉडेल्स पाहून प्रत्येकालाच तसे दिसण्याची ओढ पहायला मिळते. दिवसेंदिवस ब्युटी आणि कॉस्मेटिक ह्या क्षेत्रात विलक्षण प्रगती होते आहे, आणि एबीसी सारखे क्लिनीक ह्या गरजांसाठी उपयुक्त ठरते.
काय वापरावे काय वापरू नये असा सहाजिक प्रश्न सगळ्यांनाच पडतो. ह्या प्रश्नाचा तोडगा एबीसी क्लिनिकने काढण्याचे ठरविले व कमी वेळातच एबीसीची लोकप्रियता वाढली.एबीसी ह्या वेगाने वाढणाऱ्या ब्युटी अँड कॉस्मेटिक क्लिनिकच्या १७व्या शाखेचे पुण्यात उद्घाटन झाले. ह्यावेळी भविष्यात १०० क्लिनिकचा आकडा भारतात आणि मिडल इस्ट येथे पार करण्याचे ध्येयदेखील त्यांनी व्यक्त केले.
त्वचा, केस, फिटनेस ह्या सर्वबाबतीत एबीसी क्लिनिकने उत्तमोत्तम ब्रांडस आणले असून ह्याठिकाणी उत्तम सेवा देण्याचा एबीसीचा विश्वास आहे. अॅडव्हान्स्ड ग्रोहेयर, माया स्कीन, मायनस कॉस्मेटिक्स आणि डॉडेंटीस्ट हे जगातील सर्वोत्तम, सुरक्षित आणि अफोर्डेबल ब्रांड आहेत.
अॅडव्हान्स्ड ग्रोहेयर आणि माया स्कीन, मायनस कॉस्मेटिक्स ही केसांच्याआणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्याची एक खात्रीशीर टेक्नोलोजी असून ह्यात सर्वात नवीन पद्धती, जगभरातील प्रशिक्षित सर्जन्स, उच्च प्रतीची स्वच्छता आणि कस्टमर केअरचा समावेश आहे.
मायनस कॉस्मेटिक्स हा फिटनेससाठीचा विश्वसनीय उपाय आहे. त्याचबरोबर गरोदर स्त्रियांच्या ट्रान्सफोरमेशनसाठीदेखील एबीसी क्लिनिक मदत करते.