पुणे – आंतरभारती आश्रमतर्फे डॉ. सतिश सावरकर यांच्या स्वास्थ्य समस्या निवारण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. औषधींपासून मुक्तता करीत व्याधी कशा पध्दतीने बºया करता येतील, याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही तीन दिवसीय कार्यशाळा मोफत असून, दिनांक ६ ते ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ ते ९ यावेळेत सिंहगड रोड, माणिकबाग येथील सिध्दार्थ हॉल मध्ये कार्यशाळा होणार आहे.
कार्यशाळेअंतर्गत हृदयरोग, डायबेटिस, थॉयराईड, वातरोग, डिप्रेशन, निद्राविकार यांसारख्या अनेक व्याधी औषधाशिवाय बºया करण्याच्या सहज सोप्या प्रकियेविषयी डॉ. सावरकर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी एनर्जी मशिनद्वारे चक्रांची तपासणी करून स्वास्थ्य संबंधीत समस्यांचे निदान केले जाणार आहे. दिनांक ६ व ८ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ९ यावेळेत संजीवनी क्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्वसनासंबंधी सविस्तर तसेच दिर्घ शिथलीकरण प्रक्रिया व ध्यान घेतले जाईल.
डॉ. सावरकर म्हणाले, धावपळीच्या जीवनशैलीमुळे विकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मनावर व शरीरावर येणाºया तणावाचा परिणाम हळूहळू व्याधींच्या स्वरूपात दिसू लागतो. त्यामुळे औषध घेण्याचे प्रमाण देखील वाढते. औषधांशिवाय व्याधी कशा बºया करायच्या व निरोगी जीवन कसे जगायचे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचा पुढील भाग सेल्फ हिलींग शिबीर असून या शिबीरांतर्गत आध्यात्मिक उर्जाद्वारे शरीर आणि मनाचे शुध्दीकरण व त्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सतिश सावरकर यांच्याशी ८३०८५४५१४० या क्रमांकावर संपर्क साधावा.