पुणे – कॉम्प्युटर्स अँड मीडिया डीलर्स असोसिएशन ‘ने आयोजित ‘ आय . टी . एक्स्पो २०१७ ‘ मध्ये भेट देणाऱ्या नागरिकांसाठी ‘ इलेक्ट्रॉनिक वेस्ट ‘ ची माहिती देण्यासाठी माहिती आणि संकलन केंद्र सुरु केल्याची माहिती ‘आनंद कॉम्प्युटर्स सिस्टिम्स ‘चे संचालक संजय भंडारी यांनी दिली . कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या एक्स्पोच्या प्रवेशद्वारावरच हे संकलन केंद्र उभारण्यात आले आहे .
एक्स्पो च्या उदघाटनानंतर अमृता फडणवीस यांनी इ वेस्ट कलेक्शन सेंटर ला भेट दिली .’संगणक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील वस्तूंच्या पुनर्वापराला प्रोत्साहन दिल्यास पर्यावरणाचे अनेक प्रश्न कमी होण्यास मदत होईल ,असे उद्गार त्यांनी यावेळी काढले .
महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाची मान्यताप्राप्त ‘इ -वेस्ट ‘ एजेन्सी असलेल्या ‘आनंद कॉम्प्युटर्स सिस्टिम्स ‘ च्या या माहिती आणि संकलन केंद्रात इलेक्ट्रॉनिक कचरा ,पुनर्वापर याबद्दल माहिती दिली जात आहे . तसेच नागरिकांनी आणलेले ‘इ -वेस्ट ‘ स्वीकारले जात आहे .
नागरिकांना,आस्थापना आणि माहिती -तंत्रज्ञान कंपन्यांना इ -वेस्ट बद्दल असलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ,संकलनासाठी हेल्पलाईन देखील सुरु करण्यात आली असून
9371015373
या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
‘भारतात दरवर्षी ५० मेट्रिक टन इ -वेस्ट तयार होत असून पर्यावरण जपण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साहित्यातून पुनर्वापर करणे हा एक प्रभावी उपाय आहे ‘असे यावेळी सांगण्यात आले .
पुणे आय टी एक्स्पो २०१७ ‘ हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून 7 ते ११ डिसेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत इ -वेस्ट माहिती आणि संकलन केंद्राला नागरिकांना भेट देता येईल.